आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी उपचार पद्घतीने कॅन्सर आजारावर नियंत्रण शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अलीकडच्या काळात इतर आजारांनी मृत्यू पावणार्‍या रुग्णांपेक्षा कॅन्सरने दगावणार्‍यांची संख्या अधिक आहे. भारतात दरवर्षी कॅन्सर आजाराने 8 लाख व्यक्ती बाधित होतात. त्यातील सुमारे साडेपाच लाख रुग्ण दगावतात. या आकडेवारीवरून या आजाराची गंभीरता लक्षात येते. आजार भयंकर असला तरी यावर मात करता येते. आधुनिक उपचारपद्धतीने सुमारे 90 टक्क्यांपेक्षाही अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन कॅन्सरमुक्त जीवन जगू शकतात़ 4 फेब्रुवारी रोजी हा जागतिक कॅन्सर दिन.त्यानिमित्त..

कर्करोग कशाला म्हणतात.. : मानवी शरीर अनेक पेशींनी बनले आहे. प्रत्येक पेशीचे काम वेगळे असत़े या कामात जोपर्यंत सुसूत्रता असते तोपर्यंत प्रकृती संतुलित असत़े डीएनए प्रत्येक पेशींना नियंत्रित करतो़ या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास या पेशींना पाठवलेले संदेश पोहोचत नाहीत़ यामुळे या पेशी आपल्या र्मजीने वागतात आणि इतर पेशींच्या कामात अडथळा आणतात़ त्यांची अपरिमित, अनियंत्रित वाढ सुरू होत़े या वाढीला कर्करोग म्हटले जात़े यामुळे हा भाग निकामी तर होतोच पण शरीराच्या इतरही भागात याचे लोण पसरते. या आजाराची पहिल्या टप्प्यातील वाढ लक्षात येत नाही़ दुसर्‍या टप्प्यात याची जाणीव तीव्र बनते. या पायरीवर नियंत्रण मिळवणे हे अशक्य होत़े पण योग्य टप्प्यात याचे निदान झाले तर यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य असत़े

कॅन्सरचे प्रकार : ब्लॉडर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, बोन मॅरो कॅन्सर, कोलोन कॅन्सर, स्वरयंत्राचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, स्त्रीअंडकोष कॅन्सर, पुरुष ग्रंथीचा कॅन्सर, गुद्द्वार कॅन्सर.

आधुनिक तपासण्यांचा उपयोग करणे गरजेचे
या आजाराच्या निदानासाठी करण्यात येणार्‍या तपासण्यांमध्ये हिमोग्रॅम, मलमूत्रांची तपासणी, छातीचा एक्स-रे, सोनोग्राफी, पॅप स्मिअर, मॅमोग्राफी यांसारख्या तपासण्यांचा समावेश आह़े. आता अत्याधुनिक पीईटी-सिटी स्कॅन मशीनही उपलब्ध झाले आह़े या मशीनच्या आधारे संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात येत़े. यापुढील टप्प्यात जेन थेरपी, टार्गेटेड थेरपी, सिस्टेमेटिक थेरपी, सायबर क्राईफ या विविध उपचारांमुळे या आजारावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आणण्यासाठी मदत होणार आहे. भविष्यातील उपचारात स्टेम सेल थेरपीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कॅन्सर होण्याची कारणे
कॅन्सर होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये सामान्यत: वातावरणातील प्रदूषण, कीटकनाशके आणि रसायनांचा अतिरिक्त वापर, खाण्याच्या अनियंत्रित वेळा, ताण-तणाव, आहारात असणारा पोषक तत्त्वांचा अभाव, अनुवंशिक विकृती, अति मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, गुटखा सेवन या बाबी आढळून येतात.

कॅन्सर उपचारांदरम्यान रुग्णाचे मनोबलही वाढवणे गरजेचे असत़े रुग्णालाही परवडेल अशी उपचारपद्घती यासाठी निर्माण करणे हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे.’’ डॉ. पराग कुमठेकर , कॅन्सरतज्ज्ञ

काय काळजी घ्याल
दीर्घकाळ येणारा थकवा, आवाजातील बदल, खोकला, थुंकीतून रक्त येणे, वाढलेली व न दुखणारी गाठ, अनेकदा स्त्रियांच्या स्तनांमध्ये निर्माण होणारी गाठ, अचानक होणारा रक्तस्राव याची तपासणी करणे आवश्यक आह़े. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सोलापुरातील विविध प्रकारच्या कॅन्सर रुग्णांचे प्रमाण
तंबाखू-गुटख्यामुळे होणारा कॅन्सर : 40 ते 50%
फुफ्फसांचा कॅन्सरचे प्रमाण : 10 ते 15%
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण : 25 ते 30%
गर्भाशय कॅन्सरचे प्रमाण : 40%