आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidate Dead In Military Recruitment In Solapur

सोलापुरात सैन्‍य भरतीत धावताना तरूणाचा मृत्‍यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोरेगाव येथील राज्‍य राखीव पोलिस दलाच्‍या (एसआरपी) मैदानावर आज (मंगळवार) सकाळी भारतीय सैन्‍य दलाच्‍या भरतीप्रक्रिये दरम्‍यान सांगलीहून आलेल्‍या एका तरूणाचा मृत्‍यू झाला.

समीर कुतबोद्दीन येलूरकर (वय 21, रा. धूळगाव जि. सांगली) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, समीर आज सकाळी साडेसात वाजता विजापूर रोडवरील एसआरपी मैदानावर धावण्‍याच्‍या चाचणीमध्‍ये दुस-या फेरीवेळी अचानक खाली पडला. त्‍यावेळी मैदानात उपस्थित असलेल्‍या डॉक्‍टरांनी त्‍याच्‍यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रूग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला.