आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकलूज - शरद पवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याचे काम करू, अशी ग्वाही माळशिरसमधील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दिली.माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची रूपरेषा आखण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार रमेश शेंडगे या निरीक्षकांसह प्रमुख पदाधिकार्यांची बैठक मंगळवारी अकलूजमध्ये झाली. यावेळी आमदार विजयसिंह मोहिते, आमदार हनुमंत डोळस, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते, मनोहर डोंगरे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, आमदार दीपक साळुंखे, बळीराम साठे, रामेश्वर मासाळ, फत्तेसिंह माने पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, गणपत वाघमोडे, आमदार हनुमंत डोळस यांनी शरद पवार देतील त्या उमेदवाराचे काम करण्याचे आश्वासन दिले. आमदार विजयसिंह मोहिते यांनी शरद पवार यांच्या कार्याचा गौरव करत या वेळीही माढय़ातून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगितले. गतवेळी पवार यांना जेवढे मताधिक्य मिळाले तेवढे मनाधिक्य या वेळीही मिळवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
स्थापनेच्या आठवणी
राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी शिवरत्नवर याच ठिकाणी आमची बैठक झाली. याकडे राज्याचे लक्ष लागले होते. येथील निर्णयानंतरच पुढील निर्णय होणार होते. विजयदादांनी जिल्ह्याचा होकार कळवल्यानंतरच पक्षाचे पुढील निर्णय झाल्याची आठवण आमदार दीपक साळुंखे यांनी यावेळी सांगितली. विजयदादांनी राष्ट्रवादीत येऊन पक्षाला ताकद दिली, असे आमदार रामराजे यांनी सांगितले.
समीकरणाचे संकेत
निवडणुकीनंतर देशात कदाचित नवी राजकीय समीकरणे अस्तित्वात येतील, असे संकेत आर.आर. पाटील यांनी दिले. यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त खासदार निवडून जायला हवेत. माढय़ात मी निरीक्षक म्हणून आलो असलो तरी उमेदवारीचा निर्णय पवारच घेतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.