आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidates Narasayya Adama, Lataest News In Divya Marathi

लालझेंडे, लालसलाम निघाली जनता आम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डोक्यावरलालरंगाच्या टोप्या, गळ्यात लाल उपरणे, हातात लालझेंडा आणि मूठ आवळून लालसलाम. दाटीवाटीने निघणारा हा समूह शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सोमवारी दिसला. सहभागी जनता अतिशय सामान्य होती. बांधकाम कामगार, विडी कामगार, घरेलु कामगार अशा कष्टकरी वर्गातले होते. ढोल-ताशा नाही, मोठ्या गाड्यांचा ताफा नाही, फटाके नाहीत, कोणी स्टार प्रचारक नाही. तरीही या पदयात्रेत जोश होता.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर आणि जिल्ह्यातील एकमेव उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचाराची सोमवारी भव्य पदयात्रेने सांगता झाली. स्वत: आडम लालरंगाचा पेहराव करून उघड्या वाहनावर उभे राहिले. त्यांच्या सोबत एस. एम. इरफान, सिद्धप्पा कलशेट्टी होते. त्यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका वाहनावर प्रमुख नेतेगण आणि सौ. कामिनी आडम होत्या. झेंडे घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांत युवकांची संख्या मोठी होती. लालसलामीच्या प्रचंड घोषणा होत्या.
दत्तनगर, किडवाई चौक, बाराइमाम चौक, विजापूर वेस, शासकीय रुग्णालय, बेडर पूल, मौलाली चौक, शास्त्रीनगर आदी भागांतून ही पदयात्रा निघाली. बापूजीनगर येथे जाहीर सभेने त्याची सांगता झाली.