आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्मथ शिक्षकच विद्यार्थी घडवतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘शिक्षकाला साधारण समजू नका.शाळेत एक जरी ध्येयवादी सर्मथ शिक्षक असेल तर तो पूर्ण शाळेतील वातावरण सकारात्मक करू शकतो’, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे जीवनव्रती व प्रांत संघटक विश्वास लपालकर यांनी केले. जुळे सोलापूर येथील मेहता शाळेत विवेकानंद केंद्र सेंटर फॉर ह्युमन एक्सलन्सतर्फे राज्यभरातील निवडक प्रतिनिधींसाठी ‘सर्मथ शिक्षक’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यभरातून प्रतिनिधी सहभागी झाले. समारोपाच्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक दीपक पाटील व्यासपीठावर होते. चार दिवसीय निवासी शिबिरात कन्याकुमारी येथील जीवनव्रती दीपक खैरे, योगतज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी, प्रा. शिवराज पाटील, प्रा. सुनील कुलकर्णी, प्रा. प्रशांत स्वामी यांनी मार्गदर्शन केले. वल्लभदास गोयदानी, दुर्गाप्रसाद मिणीयार, प्रा. अनिता अलकुंटे, राजन रिसबूड, र्शीकांत माईनहळ्ळीकर आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण आजची गरज
दीपक पाटील म्हणाले, ‘केवळ काम करण्याची इच्छा असणे पुरेसे नसते. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही महत्त्वाचे असते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रशिक्षण गरजेचे झाले आहे, ही बाब ध्यानात घेऊनच विविध क्षेत्रांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना विवेकानंद केंद्राने ह्युमन एक्सलन्सच्या माध्यमातून आखली आहे.’

परीक्षा देऊया हसत-खेळत
मेहता शाळेच्या निवडक 40 विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा देऊया हसत-खेळत’ हे शिबिर घेण्यात आले. मनाच्या एकाग्रतेचे रहस्य उलगडत अभ्यासाप्रती शास्त्रशुद्ध दृष्टी या शिबिरातून देण्यात येते, अशी माहिती प्रा. सुनील यांनी दिली. शहरात गेल्या चार वर्षांत दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ अभ्यास व्यर्थ
अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या शाळांची तीन दशके जबाबदारी सांभाळलेले लपालकर म्हणाले, ‘शिक्षक कितीही अभ्यासू असू द्या, मुलांप्रती मनात प्रेम नसेल तर त्याचा अभ्यास व्यर्थ ठरतो.’ उदाहरणे, शिक्षण क्षेत्रातील प्रयोगांचे दाखले देत त्यांनी विद्यार्थी, शिक्षकातील आरोग्यपूर्ण संबंधाचे महत्त्व सांगितले.