आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई क्षेत्राविषयीचे गैरसमज मनातून काढा, कॅप्टन स्वप्निल बाहेती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अनेकांना विमानांचे खूप आकर्षण असते. विमानांची भुरळ सर्वांनाच पडते. मात्र, विमान अथवा हवाई क्षेत्राबद्दल खूप जणांच्या मनात गैरसमज आहेत. करिअरसाठी हवाई क्षेत्र चांगले पण खूप महागडे आहे. आपल्याला त्याचा खर्च झेपणार नाही. या गैरसमजूतीने आपण हवाई क्षेत्राला आपल्यापासून लांब ठेवतो. विनाकारण त्याच्याविषयी मनात भीती निर्माण झाल्याने हवाई क्षेत्र आपल्यासाठी नाही हा विचार येतो. आता मात्र प्रत्येका जण हवाई क्षेत्र चांगले करिअर करू शकतो, हा विचार अंगीकारा. हवाई क्षेत्र आपल्यासाठी नाही हा विचार सोडा, असे मत कॅप्टन स्वप्निल बाहेती यांनी मांडले.
शनिवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात सोलापूर अद्वीप फ्लाइंग असोसिएशन रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ इस्टच्या वतीने "हवाई क्षेत्रातील करिअर' या विषयावर स्वप्निल बाहेती यांनी आपले विचार मांडले. या वेळी व्यासपीठावर कॅप्टन रमेश राव, पवन मोंढे, राकेश उदगिरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कॅप्टन रमेश राव यांनी सोलापुरात अशा प्रकारच्या फ्लाइंग फेस्टिव्हलचे आयोजन होणे ही खूप चांगली बाब आहे. याला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. हवाई क्षेत्राविषयीचे गैरसमज मनातून काढा
किमान पदवीधर असावे
याक्षेत्रात आपण येताना शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त असणे महत्त्वाचे आहे. आपली उंची वजन यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. आपण किमान पदवीधर असणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात येण्यासाठी आपल्याला इग्रंजी भाषेचे ज्ञान तसेच सामान्य ज्ञान चांगले असणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण घेण्यासाठी हवी इन्स्टिट्यूटची योग्य निवड
आजहवाई क्षेत्रात येण्याचे शिक्षण घेण्यासाठी इन्स्टिट्यूटही तयार झाल्या आहेत. त्यातून चांगले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना िमळत आहे. कोणत्याही इन्स्टिट्यूटची निवड करताना त्यातील कर्मचारी कसे आहेत, त्याला कोणकोणत्या संस्थांची मान्यता आहे, त्यांचा अभ्यासक्रम मात्यताप्राप्त संस्थेशी संलग्न आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये हवाई क्षेत्रातील करिअरचे कोर्स लावण्यापूर्वी तो डायरेक्शर ऑफ सिव्हिल एव्हिएशन, आयटा अशा मान्यता प्राप्त संस्थांशी निगडित आहे की नाही, हे पाहावे.

युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी
हवाईक्षेत्रात ग्राऊन्ड हॅन्डलिंगपासून ते केबीन क्रूपर्यंत तसेच विमानतळ व्यवस्थापकापासून ते विमानतळ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी नोकरीच्या चांगल्या संधी असतात. यात करिअर करणाऱ्यांसाठी किमान 18 वय असणे आवश्यक आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला या क्षेत्रात येता येईल. हवाई क्षेत्रात सर्वात जास्त गैरसमज केबीन क्रूबद्दल आहे. केबीन क्रूमध्ये एअर हॉस्टेस फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश येतो. यांना बऱ्याचदा वेटर म्हणून हिणवले जाते. पण तसे नाही. विमान जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये असते तेव्हा प्रवाशांना धीर देण्याचे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी हेच कर्मचारी प्रयत्न करीत असतात.