आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-रिक्षाच्या अपघातात महाविद्यालयीन तरुण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रिक्षातून दयानंद महाविद्यालयाकडे जाताना समोरून येणाऱ्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सागर भागवत गोसावी (वय २०, रा. तळेहिप्परगा, सोलापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. हा अपघात तुळजापूर रस्त्यावरील पसारे वस्तीजवळ सकाळी अकराच्या सुमाराला झाला.
सागर हा अॉटोरिक्षातून (एमएच १३ जी ७१२४) कुंभारवेसकडे जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने (एमएच १३ एझेड ५४२२) रिक्षाला ठोकर िदली. यात सागर जखमी झाला.त्याला उपचाराकरता शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या अपघातातील अन्य सहाजणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे याप्रमाणे : रिक्षाचालक साहेबलाल मुल्ला (वय २६, रा. तळेहिप्परगा), अशोक जाधव (वय १४, खडकी तांडा), शरणप्पा जाधव (वय १६, रा. लातूर), रमेश राठोड (वय ३०, रा. औसा), व्यंकट जाधव (वय २२, नवीन तुळजापूर नाका), इंदूबाई राठोड (वय ३५, रा. एकांबी तांडा).
घराजवळच अपघात, नातेवाइक धावत आले
दयानंद महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सागरच्या अंगावर कॉलेजचा गणवेश, सॅकमध्ये दप्तर होते. घरापासून तो रिक्षात बसल्यानंतर अवघ्या पाचशे फुटावर झालेल्या अपघातानंतर नागरिकांची गर्दी जमली. काही नातेवाइकही अपघात पाहण्यासाठी आल्यानंतर सागरच गंभीर जखमी झाल्याचे पाहून आई-वडिलांना माहिती देण्यात आली. उपचाराला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर तो मृत पावल्याचे सांगण्यात आले. त्याचे वडील खासगी छायाचित्रकार तर आई गृिहणी आहे. दुपारी दोनच्या सुमाराला पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. कारचालकाला अटक झाली नाही, त्याचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितले.