आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठासाठी सोलापुरात वकिलांची कार रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी 7 सप्टेंबरपासून वकील कामकाजापासून अलिप्त आहेत. चक्री उपोषणही सुरू आहे. ते 17 ऑक्टोबरपर्यंत चालेल. आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी जिल्हा न्यायालयापासून वकिलांनी कार रॅली काढली. सुमारे पन्नास कारमधून दोनशेहून अधिक वकील यात सहभागी झाले होते. शासकीय रुग्णालय, वालचंद, दयानंद कॉलेज, सम्राट चौक, शिवाजी चौक ते चार पुतळा चौकात समारोप झाला. बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके, संतोष न्हावकर, महेश जगताप, अमित आळंगे, स्वाती बिराजदार यांनी रॅलीचे नियोजन केले. लातूर, उस्मानाबादच्या वकिलांनी सोलापूर खंडपीठासाठी पाठिंबा दिला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस उस्मानाबादच्या वकिलांनी कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अँड. न्हावकर यांनी दिली. रॅलीत रजाक शेख, व्ही. एस. आळंगे, व्ही. डी. फताटे, भारत कट्टे, मंगला चिंचोळकर, लक्ष्मण मारडकर, विद्यावंत पांढरे, मल्लिनाथ राचेट्टी, सुरेश गायकवाड, विक्रांत फताटे, नीलेश ठोकडे, वामनराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.