आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात बारा कोटींची रोकड जप्त;पाच जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुण्याहून पंढरपूरकडे जाणार्‍या बोलेरो वाहनातील 12 कोटी रुपयांची रोकड येथील भीमानगर तपासणी नाक्यावर शुक्रवारी जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची असल्याचे निष्पन्न झाले असून 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही रक्कम कशासाठी आणली होती याचा तपास केला जात होता.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी तपासणी नाके तैनात केले आहेत. शुक्रवारी बोलेरो गाडीची कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता 12 कोटी रुपये असल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्मचार्‍यांनी रोख रक्कम जप्त केली व व्यक्तींना ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. या रकमेची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. माढा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी रक्कम पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.