आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सप्टेंबरअखेरपर्यंत जात पडताळणी पूर्ण करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार यंदा 30 सप्टेंबरच्या आत तपासणी पूर्ण होईल. विज्ञान शाखेत बारावी शिकत असलेल्या मागास विद्यार्थ्यांनी 30 जूनच्या आत अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील कार्यवाहीच्या तारखाही सरकारने जाहीर केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु असे प्रमाणपत्र मुदतीत मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी अडचणी येतात. या स्थितीवर सरकारने पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन केले आहे.
अशा तारखा असे नियोजन
1. 2014-15 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचे आहे, अशांनी 30 जूनच्या आत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज करावा.

2. महाविद्यालयांनी प्रस्ताव समाजकल्याण खात्याच्या साहाय्यक आयुक्तांकडे 7 जुलैच्या आत पाठवावेत.

3. साहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी प्रस्तावाची छाननी करून विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 15 जुलैच्या आत पाठवावेत.

4. समितीने 30 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावयाचा आहे.