आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Caste Validity Certificate Late Issue In Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जात पडताळणी प्रमाणपत्र : निवडणुकीपासून वंचित; भरपाई द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर । जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात कुचराई केल्याने सोलापुरातील 42 मागास व्यक्ती महापालिका निवडणुकीपासून वंचित राहिल्या. त्यांना दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिक निवडणूक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बसवराज येरनाळे यांनी केली.श्री. येरनाळे यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशाच प्रकारच्या राज्यभरातील 55 याचिका एकत्र करून न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर व एन. एम. जामदार यांनी निकाल देताना, जात पडताळणी समित्या बेकायदेशीर ठरवल्या. त्यांनी दिलेली प्रमाणपत्रेही रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयावर सर्वाेच्च न्यायालयात जाण्यासाठी राज्य सरकारला 10 आठवड्यांची मुदत दिली. यात याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी कॅव्हेट दाखल करणार असल्याचे श्री. येरनाळे म्हणाले. दोन कोटी रुपयांची भरपाईची मागणी त्यात ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी जमीर शेख, कय्युम सिद्दिकी, हनिफ मुछाले, सिद्धाराम ढोपरे, रहिमाने चितापुरे, राहुल वांगी आदी उपस्थित होते.