आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर: स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून सोनोग्राफी सेंटरपाठोपाठ आता सिटी स्कॅन आणि एमआरआय मशिनचीही नोंदणी जिल्हा रुग्णालयाकडे करणे बंधनकारक करण्याच्या हालचाली जिल्हा शल्यचिकित्सांनी सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्य पातळीवरून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत निर्णय घेऊन त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एन. रावखंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
गर्भलिंग निदान विरोधी काय्यद्यात स्कॅनिंग असा उल्लेख आहे. या कायद्यानुसार स्कॅनिंग आणि एमआरआय मशीन नोंदणीच्या कक्षेत आणण्याचा विचार जिल्हा रुग्णालयाच्या पातळीवर सुरू आहे. सिटी स्कॅनमधील व्हेवज तशा गर्भाला धोकादायक ठरू शकतात. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भलिंग ओळखले जाऊ शकते. त्यामुळे या केंद्र चालकांना नोंदणी बंधनकारक करावयाची आहे.
सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध आजारांचे निदान करणे सोपे झाले आहे. मात्र, या सुविधांचा गैरफायदा गर्भलिंग निदानसाठी केला जात आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर घटतो आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चिकित्सा कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सोनोग्राफी केंद्रांना जिल्हा रुग्णालयात नोंदणी करणे, तसेच तपासणी केलेल्या रुग्णांची सविस्तर माहिती ऑनलाइन भरणे, जिल्हा रुग्णालयातील पीएनडीटी केंद्राकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गर्भवती मातांच्या माहितीवरून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबाबत उपाययोजना राबवल्या जात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.