आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात मृत स्त्री अर्भक आढळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बेगम पेठ परिसरातील ख्रिस्त सेवा मंदिर येथे सकाळी सातच्या सुमारास स्त्री अर्भक मृत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दत्तात्रय मैनाजी कांबळे (वय 61, रा. न्यू लक्ष्मी चाळ देगाव रोड) या व्यक्तीचा ख्रिश्चन सेवा मंदिरजवळ दूध विक्रीचा व्यवसाय आहे. खोक्याच्या मागे कांबळे यांना काळ्या रंगाच्या कपड्यात अर्भक गुंडाळलेले दिसले. त्याचे डोळे बंद व हात-पाय सरळ असल्याचे दिसून आले. कांबळे यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृत अर्भक शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्त करण्यात आले. या प्रकरणाची फिर्याद दत्तात्रय कांबळे यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात नोंद केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

तान्हुली जाणार पाखर संकुलात
सोलापूर- सोलापूर रेल्वे स्टेशन येथे बुधवारी बेवारस आढळलेल्या तान्हुलीची प्रकृती उत्तम आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत तिला पाखर संकुल येथे दाखल करण्यात येईल, अशी माहिती चाईल्ड लाइनच्या समन्वयक सारिका तमशेट्टी यांनी दिली. स्टेशन येथे एका ठिकाणी महिलेने काही दिवसांच्या तान्हुलीला सोडून गेल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले. बुधवार आणि गुरुवार दोन दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. गुरुवारी तिची प्रकृती उत्तम आहे. शुक्रवारी डॉक्टरांकडून तपासणी होईल. यानंतर बाल कल्याण समितीच्या बैठकीत तिला पाखर संकुल येथे दाखल करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे तमशेट्टी यांनी सांगितले.

दहा वर्षात विविध प्रकारे बाळ आलेले पाहिले आहेत. यंदा मात्र प्रमाण वाढले आहे. त्यात स्त्री अर्भक येण्याचे प्रमाणही वाढले आहे. समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.’’
-शुभांगी बुवा, पाखर संकुल संचालिका

कोवळ्या फुलाची विटंबना सुरूच
सोलापूर- सोलापुरात 2012 मध्ये 13 नवजात अर्भकांना उघड्यावर टाकण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावर, कचरा कुंडीत, नाल्याच्या कडेला तर कधी शेताच्या शिवारात अशा निर्जन स्थळी ही कोवळी फुले सहज टाकली जात आहेत. त्यांना पाखर संकुल मायेच्या सावलीखाली घेत आहे. कधी कु मारी माता, मुलगा हवा ही कारणे, तर गर्भपात करणारे माता पिता यांची गर्भलिंग निदान कायद्याने बांधलेली मुसक्या यामुळे हे प्रकार वाढले आहेत.