आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू परिसरात सीसीटीव्ही; गैरप्रकार आढळल्यास गुन्हा दाखल करा- जिल्हाधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू कार्यालय आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पैसे देवाण-घेवाणीसह काहीही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

डॉ. गेडाम यांनी मंगळवारी नागरी सुविधा केंद्र, सेतू कार्यालयास भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सेतू कार्यालय परिसरात लेखनिकाचे काम करणार्‍या अपंग युवक-युवतींना सन्मानाने जगण्याचा सल्ला देताना डॉ. गेडाम यांनी त्यांना उद्योगासाठी कर्ज देऊ, प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार नव्याने घेतल्यानंतर अवघ्या महिनाभरात डॉ. गेडाम यांनी रूळावरून उतरलेला महसूलचा गाडा पूर्ववत रूळावर आणला. डॉ. गेडाम यांच्या कार्यपद्धतीची माहिती असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांनी तर आदेशाची वाट न पाहता, थेट कामास सुरुवात केली आहे. दुष्काळाचे बिघडलेले नियोजन उपलब्ध परिस्थितीत आणि अगदी अल्प कालावधीत सुरळीत केल्याने डॉ. गेडाम यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विभागीय आयुक्तांनी सोलापूर दौर्‍यात कौतुक केले होते. करमणूक कर कार्यालय परिसरात असलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुय्यम निबंधक उत्तर एक व दोन कार्यालयाकडे कामानिमित्त जाणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच लावतात. प्रवेशद्वार खुले केल्यास वाहने रस्त्यावर लावली जाणार नाहीत, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.