आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात महाविद्यालये घेताहेत सुरक्षिततेची काळजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दिल्लीतील प्रकरणानंतर सोलापुरातील बहुतांश महाविद्यालये सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत आहेत. संगमेश्वर, वालचंद महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दयानंद महाविद्यालयात सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय तरुणींसाठी तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे. पोलिस दररोज आढावा घेतात. काही समस्या निर्माण झाल्यास तत्काळ दखल घेतली जाते.
दिल्लीतील घटनेनंतर शाळा, कॉलेज, मार्केट परिसरात होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिस विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापकांची बैठक घेतली. त्यावेळी पोलिसांनी काही सूचना केल्या होत्या. समन्वयातून मार्ग निघत आहे. महाविद्यालयांत तक्रार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित पोलिस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक, अधिकार्‍यांचे मोबाइल क्रमांक तक्रार पेट्यांसह महाविद्यालयांत उपलब्ध आहेत.

संगमेश्वर महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे. एकही तक्रार आलेली नाही अशीच स्थिती वालचंद, दयानंद महाविद्यालयांत आहे. पोलिसांशिवाय प्राध्यापक, प्राचार्य हेही विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेत आहेत.

जागृतीसाठी फलक
छेडछाड रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरात जनजागृतीसाठी माहिती पत्रके लावण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थांची मदतही घेणार आहोत.’’
- सुभाष बुरसे, पोलिस उपायुक्त

पोलिस-छात्र मित्र योजनेला प्रतिसाद
पोलिस छात्र-मित्र योजनेला प्रतिसाद मिळत आहे. छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी ही योजना सुरू केली आहे. काही विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. समस्या असल्यास सोडवतात अथवा पोलिसांना माहिती देतात. आतापर्यंत दीडशेहून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा, शोभेचे दारूकाम, गड्डा यात्रेत या योजनेतील सदस्यांनी मदत केल्याचे साहाय्यक पोलिस आयुक्त सी. आर. रोडे यांनी सांगितले.

महाविद्यालयांत अधिक काळजी
‘वालचंद’च्या परिसरात पोलिसांची गस्त असते. आम्हीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतो, असे प्राचार्य डॉ. माणिकशेटे यांनी सांगितले. तक्रार पेटी ठेवली आहे, असे दयानंदचे प्राचार्य डॉ. र्शीनिवास वडकबाळकर यांनी सांगितले. संगमेश्वर महाविद्यालयात आयडी, ड्रेसकोडशिवाय विद्यार्थ्यांना आवारात फिरकू देत नाहीत. पोलिस सतर्क आहेत. तक्रार पेटीही ठेवली असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचे उपप्राचार्य विलास मोरे यांनी सांगितले.