आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील कानाकोप-यात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातमिरवणूक मार्गावर, बाजारपेठेत, सोसायटी, संवेदनशील परिसरात, शाळेसमोर आदी ठिकाणी होणा-या चो-या तसेच चुकीच्या प्रकारांवर आळा बसवण्याकरिता पोलिसांकडून उत्तम असे प्रयत्न केले जात आहेत. क्षमता असलेल्या नागरिकांना समजावून सांगून त्यांच्यामार्फत रस्त्यावर, चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. ज्या व्यावसायिकांच्या दुकानासमोर किंवा शोरुमसमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशांना भेटून त्यांनी मोठ्या क्षमतेचा एक सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील बाजूस लावणे. तसेच ज्यांना शक्य आहे अशांना बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भात समजावून सांगणे. या कॅमेऱ्याचा त्यांच्यासह इतरांनाही उपयोग होते, हे पटवून देणे आदींबाबत चर्चा करून असे प्रयत्न प्रत्यक्षात करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या सूचनांनुसार काही पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी प्रयत्न केले आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.
पोलिस आयुक्तांनी आपले विचार पोलिस निरीक्षकांसमोर मांडले आणि प्रयत्न करून तरी पाहा, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्यात फौजदार चावडी आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्याने बाजी मारली. फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सरस्वती चौक, लकी चौक, दत्त चौक, खाटीक मशिद, माणिक चौक, मधला मारुती, टिळक चौक, बाळीवेस, पांजरापोळ चौक या मिरवणूक मार्गावर २५ तर नवी पेठ परिसरात नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. तर जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयवंत खाडे यांनी कन्ना चौक, म्हेत्रे गल्ली, सराफ बाजार, चाटी गल्ली आदी भागात ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.
मुख्य सीसीटीव्ही कॅमेरे होणार ऑनलाइन
शहराच्याबाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर, चौकात, संवेदनशील भागात मोठ्या क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्या कॅमेऱ्याचे ऑनलाइन पोलिस आयुक्तालयात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बंदोबस्त काळात आणि इतर वेळेतही आयुक्तालयातून पोलिसांवरही "नजर' ठेवली जाईल. एमआयडीसी, सलगर वस्ती, विजापूर नाका येथे सीसीटीव्ही नाही
नागरिकांकडून प्रतिसाद
पोलिसआयुक्त प्रदीप रासकर यांनी सूचना दिल्यानुसार आम्ही आमच्या हद्दीतील सर्व व्यापारी, श्रीमंत लोक यांना भेटून त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फायदे पटवून दिले बाहेरील बाजूस एक कॅमेरा बसवण्यास सांगितले. या उपायांवर नागरिकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही मिरवणूक मार्गावर २५ आणि नवी पेठ परिसरात कॅमेरे बसवले आहेत. अजूनही बसवण्याचे प्रयत्न आहेत. सूर्यकांतपाटील, पोलिसनिरीक्षक
चोरीचेप्रमाण कमी झाले
आमच्याहद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी नवरात्र महोत्सवात रूपाभवानी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्यामुळे एकही चोरीचा प्रकार घडला नाही. यंदा आठ बसविण्यात आले असून, अजून पाच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. निवडणुकीचा ताण जरा कमी झाल्यावर आमच्या हद्दीत सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करू. जयवंतखाडे, पोलिसनिरीक्षक
तपासकार्यात उपयोग
सीसीटीव्हीकॅमेरे बसवण्यासंदर्भात पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांची संकल्पना महत्त्वाची ठरली. त्यांच्या सूचनेनुसार शहरात मुख्य ठिकाणी आणि शाळेच्या समोरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचा पोलिसांना तपास कार्यात होतो तसेच चोरीच्या प्रकारावर नियंत्रणही बसत आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यांतील २५ संगणकही सुरू झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे ऑनलाइन लवकरच होईल. संदीपगुरमे, पोलिसनिरीक्षक, गुन्हे शाखा जेलरोड गणेशोत्सव पुरतेच