आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Center Assembly Constituency Voting Live Cast News In Marathi

बड्या नेत्यांच्या गावातील मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील११ विधानसभा मतदारसंघातील 107 मतदान केंद्रातील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विशेषत: निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवार, तालुक्यातील बडे नेते यांच्या गावातील मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेषत: मतदान केंद्रातील गडबड, बोगस मतदान आदीवर नजर ठेवण्यासाठी ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे.
करमाळा मतदारसंघातील 10 मतदान केंद्रातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, यामध्ये कुर्डुवाडी भोसरे या दोन मतदान केंद्रांसह इतर मतदान केंद्रांचा समावेश आहे. माढा मतदारसंघातील टेंभुर्णी, उपळाई बु., माढा वाकाव या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे. बार्शी मतदारसंघातील रुई, दहिटणे तर शहरातील सिल्व्हर ज्युबली स्कूल या केंद्रात होणाऱ्या मतदानाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या शेटफळ गावातील तर माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील मतदारसंघावर मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण होणार आहे. अक्कलकोट मतदारसंघातील शहाजी हायस्कूल, अक्कलकोट, जि. प. प्राथमिक शाळा, शेगाव, जि. प. प्राथमिक शाळा, तडवळ तर दुधनी येथील लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला मुलींची कन्नड शाळा येथील मतदान केंद्रातून थेट प्रक्षेपण होणार आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप माने यांचे वर्चस्व असलेल्या तिऱ्हे, बेलाटी, कवठे येथील मतदान केंद्र, नई जिंदगी येथील उर्दू मराठी हायस्कूल यासह १० मतदान केंद्रातील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पंढरपूर मतदारसंघातील कौठाळी, सांगोला मतदारसंघातील महुद, हातीद, जवळा, घेरडी, सोनंद तर माळशिरस मतदारसंघातील नातेपुते, पिलीव, अकलूज, वेळापूर येथील मतदान केंद्रातूनही थेट प्रक्षेपण कण्यात येणार आहे.
थेट प्रक्षेपणासाठी शहर उत्तर मतदारसंघातील कुचन प्रशालेच्या प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. इनसेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे.