आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही तलावांसाठी मिळणार केंद्र सरकारकडून निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वरआणि संभाजी (कंबर) या दोन तलावांसाठी प्रत्येकी ७.५ कोटी रुपयांप्रमाणे १५ कोटी निधी देण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्य केल्याची माहिती, खासदार अॅड. शरद बनसोडे यांना दिली. श्री. बनसोडे आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत श्री. जावडेकर यांची भेट घेतली.

संभाजी तलावाच्या सुशोभीकरणास सुरुवात होईल, तर सिध्देश्वर तलावाच्या सुशोभीकरणाच्या अर्धवट कामास गती मिळेल. कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर संभाजी तलाव सुधारण्यासाठी सुमारे ५.५ कोटींचा आराखडा चार वर्षापूर्वी केला होता. त्यात वाढ होऊन ७.५ कोटीपर्यंत खर्चाची रक्कम गेली आहे. हा निधी केंद्राकडून मिळवून देण्याची मागणी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी बनसोडे यांच्याकडे केली होती.

जलपर्णी गवत काढणे: १५ लाख
गाळकाढणे १५लाख
प्रदूषणकमी करणे :५० लाख
सुशोभीकरण: २०लाख
पाण्याचादर्जा राखणे : १२लाख
इतरकामे : ३५लाख ५६ हजार
उद्यान: २०लाख
कारंजे: ३५लाख
बांधकामकोटी
वृक्षारोपण: लाख
निचरा: लाख

ड्रेनेज पाणी मिश्रित होणार नाही
होटगीरस्ता परिसरातील ३६ सोसायट्यांचे सांडपाणी संभाजी तलावात सोडण्यात येते. ते बंद करण्यासाठी महापालिकेने ड्रेनेज लाइन टाकली आहे. ती लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे घाणपाणी तलावात जाणे थांबणार आहे. तलावाचे पाणी स्वच्छ राहील आणि दुर्गंधी येणे बंद होईल.

नागरिकांना होईल फायदा
संभाजीतलाव परिसरात साडेसात कोटींतून योजना केल्यास परिसराचे सौंदर्य फुलेल. त्यामुळे फिरण्यासाठी विशेषत: सकाळी येणाऱ्या नागरिकांना वाॅकिंग करता येईल. परिसराचे महत्त्व वाढेल, पर्यटक येतील. परिसरातील प्रदूषण कमी झाल्यास नागरिकांना त्यांचा फायदा होईल.

हृदय योजनेत सोलापूर वेटिंगवर
केंद्राच्याहृदय योजनेत सोलापूर शहराचा समावेश व्हावा म्हणून नगरविकास सचिव व्यंकय्या नायडू यांची बनसोडे आणि आयुक्त गुडेवार यांनी भेट घेतली. प्रस्तावाचा विचार करू किंवा पुढील टप्प्यात सोलापूर शहराचा समावेश करण्यात येईल, असे नायडू यांनी बनसोडे यांना सांगितले.

मंत्र्यांनी निधीचे आश्वासन दिले
-पर्यावरणमंत्रीप्रकाश जावडेकर यांनी संभाजी तलावासाठी ७.५ कोटी तर सिध्देश्वर तलावासाठी अन्य निधी केंद्राकडून मिळेल. जावडेकर यांना भेटून निवेदन दिले. लवकरच निधी मिळेल.” अॅड.शरद बनसोडे, खासदार