आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Government Policy Barrier In Sugar Industry Vijaysingh Mohite

केंद्राच्या धोरणामुळेच साखर उद्योग अडचणीत - विजयसिंह मोहिते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - केंद्र शासनाने साखर निर्यातीबाबतीत उदासीनता दाखवलीच. त्याशिवाय परदेशातून आयात केलेल्या 17 लाख टन कच्च्या साखरेच्या बाबतीतही लक्ष दिले नाही. त्यामुळेच साखरेचे दर पडले आहेत. केंद्राच्या या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे, असे मत राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांनी व्यक्त केले.

अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आमदार मोहिते व त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी या उभयतांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते, आमदार हनुमंत डोळस, उपाध्यक्ष रामचंद्र सावंत पाटील, मोहन लोंढे आदी उपस्थित होते. श्री. मोहिते म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या साखरेचे दर 3200 रुपयांपर्यंत होते. नंतर ते खाली येत आज 2600 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे साखर धंदा अडचणीत आला आहे. केंद्राने साखर निर्यातीला वेळेवर परवानगी देऊन योग्य असे निर्यात धोरण आखले असते, तर आज ही वेळ आली नसती. गतवर्षी काही साखर कारखान्यांनी 17 लाख टन कच्ची साखर आयात केली. तिच्यावर प्रक्रिया करून पुन्हा माघारी पाठवायला हवी होती. परंतु त्याकडे लक्ष दिले नाही.’’ कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी स्वागत केले.
तात्पुरते बघू नका

सहकारमहर्षी कारखान्याच्या सभासदांनी ऊसदरासंदर्भात तात्पुरते बघू नये, दीर्घकालीन विचार करावा, असे आवाहन विजयसिंह व जयसिंह या मोहिते बंधूंनी केले. जो जात्यावर बसतो त्यालाच त्याच्या जडपणाची जाणीव असते. जात्याचा थोडातरी घास हुकला की निघणार्‍या पिठाची प्रत खालवते. लांबून बघणार्‍यांना हे सर्व सहज व सोपे वाटते, ते तसे नसते, अशा शब्दांत मोहिते यांनी वस्तुस्थिती मांडली.