आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओ काकाणी यांनी दिली 25 ‘लेटकमर’ना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा परिषदेत उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांची तपासणी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि. 1) केली. त्यामध्ये 25 पेक्षा जास्त कर्मचारी ‘लेटकमर’ असल्याचे आढळले. त्यांना नोटीस देण्याचा आदेश काढण्यात आला.

जिल्हा परिषदेची शिस्त बिघडली असून काही कर्मचारी त्यांच्या सोईने प्रशासकीय कामकाज करत असल्याचे चित्र आहे. त्याचा फटका छोट्या-मोठय़ा कामांसाठी ग्रामीण भागातून येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. मुख्य कार्यकारी अधिकारी काकाणी यांनी बुधवारी (दि. 30) झेडपीचा पदभार घेतला. त्याच दिवशी झेडपीची बिघडलेली शिस्त सुधारण्याला प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी एक ऑगस्टला सकाळी त्यांनी मुख्यालयातील सर्व विभागांना भेटी दिल्या. साडेदहा वाजेपर्यंत ज्यांची बायोमॅट्रिक्सवर उपस्थितीची नोंद झाली नाही, त्यांना ‘लेटकमर’ घोषित करून कारणे दाखवा नोटीस देण्याचा आदेश काकाणी यांनी दिला. त्यानंतर लेखा व वित्त विभाग, माहिती व तंत्रज्ञान, समाज कल्याण, ग्रामपंचायत, कृषी व सामान्य प्रशासन विभागाला भेटी दिली. याविभागामध्ये कर्मचार्‍यांची उपस्थिती समाधानकारक नसल्याचे त्यांना आढळले. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम विभागात कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले कागदपत्रांचे गठय़ांचे संगणकीकरण करा, अभिलेख कक्षामध्ये व्यवस्थित मांडून ठेवा, अशी सूचना त्यांनी दिली.
नव्याचे नऊ दिवस नको
नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यानंतर झेडपीचा फेरफटका मारणे, आदेश व सूचनांचा भडिमार, गैरहजर कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस देणे, या घटना नेहमीच घडतात. पण, नंतर त्यांनाच भेटीदरम्यान दिलेल्या सूचनांचा विसर पडतो. वरिष्ठांच्या नव्याचे नऊ दिवस, याचा प्रत्यय झेडपी कर्मचार्‍यांना अंगवळणी पडला आहे.
पण, त्याला तत्कालीन सीईओ रमेश देवकर, सुनील केंद्रेकर, वीरेंद्र सिंह हे अपवाद होते. त्या पार्श्वभूमीवर काकाणी यांनी शुक्रवारी मुख्यालयातील सर्व विभागांना दिलेल्या भेटी अन् सूचना औपचारिकता म्हणून केल्या की त्याकडे गांभीर्याने पाहणार, याकडे कर्मचार्‍यांचे विशेष लक्ष आहे.