आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र हिसकावण्याचा बुधवारी सहावा प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. 1 ते 7 मे या कालावधीत सहा ठिकाणी या घटना घडल्या आहेत. सोमवारी रात्री दहाच्या सुमाराला लिंगायत स्मशानभूमीजवळून दुचाकीवरून जाताना अनिता शिंदे (रा. मंत्री चंडक एलआयजी ग्रुप) यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. जोडभावी पोलिसांत बुधवारी फिर्याद देण्यात आली आहे.
अनिता या पतीसह दुचाकीवरून घरी जात होत्या. दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघा तरुणांनी मंगळसूत्र हिसकावले. त्यात अर्धा भाग चोरांच्या हाती लागला. अर्धा भाग त्यांच्याकडेच राहिला. फौजदार कुंभार तपास करीत आहेत. मागील महिनाभरापासून ही 17 वी घटना आहे. सात दिवसांतील सहावी घटना आहे.
गुन्हे घडलेली ठिकाणे
रेल्वे आरपीएफ पोलिस ठाणेजवळ, सुगरण हॉटेलजवळ, सात रस्ता, अंत्रोळीकरनगर, लिंगायत स्मशानभूमीजवळ, डफरीन चौक (हॉटेल ध्रुवजवळ). या घटनांमध्ये सुमारे सोळा तोळे दागिने चोरीस गेले आहेत.