आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 दिवस आधीच सोडला पदभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी महापालिकेचा पदभार सोडला. सोमवारी ते पदभार सोडण्याची चर्चा असताना शुक्रवारी सकाळी नगरविकास मंत्रालयाकडून तातडीने पद सोडण्याचे आदेश आल्याने गुडेवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे पदभार सोपवत मनपाचा निरोप घेतला. गुडेवार यांनी आयुक्त पदाचा पदभार सोडला असला तरी ते सोलापुरात सोमवारपर्यंत राहणार आहेत.

अपर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी सकाळी मेलवरून बदली आदेश बजावला. गुडेवार यांनी पदभार सोडल्याचे समजताच गुडेवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मनपा पदाधिकारी, अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती.
पोरेंची याचिका : गुरुराज पोरे यांनी दुसरी जनहित याचिका (138/2014) उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. गुडेवार यांची बदली करताना महाराष्टÑ महापालिका कायद्याचा भंग झाल्याचा मुद्दा पोरे यांनी उपस्थित केला आहे.
बदलीविरोधात जनहित याचिका
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली राजकीय उद्देश्याने प्रेरीत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दाखल केली आहे. याबाबत सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती श्री. आडम यांनी दिली.