आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रेनेज मक्ता रद्द करताना होती आॅफर - गुडेवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोणताही निर्णय घेताना दुसर्‍या कोणाचे तरी हितसंबंध दुखावतातच. त्यामुळे कोणाच्या दबावाखाली येऊन मला कोणताही निर्णय घ्यावा लागला नाही. ड्रेनेज टेंडर करार उल्लंघनावरून मक्ता रद्द करताना ‘आॅफर’ आली होती, पण ती धुडकावून ‘आॅन मिरिट’ मक्ता रद्द केला. ‘सत्या’चे शस्त्र तुमच्याकडे असेल तर दबाव झुगारता येतो. सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर आहे. अन्यथा मी बदलीविरुद्ध ‘मॅट’मध्ये धाव घेतली असती, असे मत मनपाचे मावळते आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केले.

श्रमिक पत्रकार संघ व महापालिका पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्रपणे शनिवारी वार्तालाप झाले. या वेळी ते बोलत होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काही केले नाही, केवळ कर्मचारी अधिकार्‍यांना उत्तरदायी बनवले इतकेच, असे ते म्हणाले. उस्मानाबाद येथे कामांमधील त्रुटीसंदर्भात मी सुभाष देशमुख यांच्या संबंधित कंपनीला 12 कोटींचा दंड लावला होता. अपिलात त्यांचा दंड माफ झाल्याचा अनुभवही सांगितला.

महापौरांचे बांधकाम
महापौर अलका राठोड यांच्या निवासस्थानाबाबत ते म्हणाले, ‘इतरांप्रमाणेच साईड मार्जिनचे लाभतत्व वापरले. त्यानंतर सात बारा उतारा आणि जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नसल्याची माहिती माझ्यासमोर आली. त्यामुळे अजूनही त्यांच्या निवासस्थान बांधकामाला परवानगी दिलेली नाही.’