आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chandrakant Gudewar Municipal Commissioner Soalpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामाच्या ठिकाणी लागतील तपशिलाचे फलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील कामे दर्जेदार व्हावीत. काम सुरू झाल्या ठिकाणी मक्तेदार, कामाचे स्वरूप, निधी, मुदत याचा फलक लावण्यात येईल. तसेच मक्तेदार आणि महापालिका अधिकार्‍यांचे मोबाइल नंबर फलकावर असतील, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.

शहरात दर्जेदार काम करण्यास आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या कामांसाठी पैसा लागतो. त्यामुळे नागरिकांनी कर भरावे. व्यापार्‍यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरावा, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यास इतर विकास कामे, महापालिकेतील गैरव्यवहार बाहेर काढण्यास वेळ मिळणार आहे. आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आदी कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांनी कर भरावे, त्याचे मोबादला महापालिका नक्की देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, तरच सुविधा देता येतील
व्यापारी आणि नागरिकांनी मनपाचे कर भरावे. दर्जेदार कामे आणि सोयी-सुविधा देण्यात येतील. नागरिकांना पाणी, आरोग्य, रस्ते आणि दिवाबत्तीची सोय दिल्यावर ते समाधानी होतील.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका

मक्तेदारांना कानमंत्र
मक्तेदारांची थकीत बिले देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी केली. मक्तेदारांसह त्यांनी र्शी. गुडेवार यांची भेट घेतली. तीन महिन्यात बिले देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कामे दर्जेदार केले पाहिजे. चुका करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त गुडेवार यांनी मक्तेदारांना सांगितले.