आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Gudewar New Dy Commissioner For Solapur

चंद्रकांत गुडेवार नवे महापालिका आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नाशिकचे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती झाली आहे. आपण सोमवारी पदभार घेणार आहोत, असे र्शी. गुडेवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांची बदली नगरविकास खात्याकडून ग्रामविकास खात्यात झाली आहे.

गुडेवार मूळचे वसमत (जि. नांदेड) येथील आहेत. त्यांनी अमरावती येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक, अकोला आणि उस्मानाबाद येथे जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. सलग 21 वर्षांचा प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. मुंबई आयआयटीचे ते एमटेक पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

भ्रष्टाचारविरुद्धचा वारू
अकोल्यात त्यांनी भ्रष्टाचार करणार्‍यांची पाळेमुळे खोदून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यातील भ्रष्टाचार, महाजल योजनेतील अनियमितते संदर्भात अनेक अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून गुन्हा दाखल केला होता. लघु सिंचन उवविभागातील अभियंत्यावर निलंबन कारवाई. बांधकाम विभागातील आठ कर्मचार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई.

उस्मानाबाद येथे जलस्वराज्य प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ग्राम समितीच्या जबाबदार पदाधिकार्‍यांच्या सात-बारा उतार्‍यावर त्यांनी बोजा चढवला होता. भ्रष्टाचार, अनियमिततेच्या प्रकरणात कठोर भूमिका घेणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा असल्याचे सांगितले जाते.

सोमवारी पदभार घेणार
माझी सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सोमवारी पदभार घेणार आहे. तेथील कामाची पद्धत, नागरी विकासास प्राधान्य आदी बाबी तेथे आल्यावर स्पष्ट करू. चंद्रकांत गुडेवार, नूतन आयुक्त, मनपा