आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी दिला आयुक्त गुडेवारांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातीलपाणीपुरवठा सुरळीत नाही, तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, यात्रा जवळ आलेली असतानाही शहरात ठिकठिकाणी कचरा पडून आहे, शहरात रस्ते चांगले नाहीत. या मूलभूत सुविधांकडे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना बदलणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या गाळ्यातील पोटभाडेकरूंवर गुडेवार कारवाई करत आहेत. १९ मिनी गाळे सील केले. शिवाय मुख्य गाळ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. मिनी गाळे सील केल्याच्या कारणावरून शनिवारी महापालिका आयुक्त गुडेवार आणि पालकमंत्री देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच शहरात चर्चा सुरू झाली.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, “शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपट्टीची आकारणी मात्र दररोजची आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा साचलाय. त्याची वेळेत विल्हेवाट होत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मूलभूत सुविधा देणारे निष्क्रिय अधिकारी बदलणे गरजेचे आहे.”

गाळेसील करा ही भाजपची भूमिका होती : पोटभाडेकरूकडीलगाळे घेऊन त्याचे फेरलिलाव करा अशी भूमिका महापालिका सभेत भाजपाने घेतली. भाडेवाढ करा म्हणून माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे यांच्या विरोधात भाजपाने आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार देशमुख यांना विचारून तो निर्णय घेतला होता, असे स्थायी सभापती सुरेश पाटील यांनी सांगितले.