आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Gudewar News In Marathi, Solapur Municipal Corporation, Divya Marathi

मनमानी कराल तर शाळेची मान्यता रद्द करू - चंद्रकांत गुडेवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करून कोणत्याही शाळेने प्रवेश प्रक्रिया राबवली तर प्रवेश प्रक्रियेचे रेकॉर्ड ताब्यात घ्या. शाळा मुख्याध्यापक ऐकत नसल्याची सबब मला नको, असे सांगून महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांची खरडपट्टी काढली. वेळापत्रक व नियमानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव तयार करा, शासनाकडे पाठवू, अशा शब्दात गुडेवार यांनी इशारा दिला.
इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित-अनुदानित काही प्रतिष्ठित शाळांमधून प्रवेशासाठी पालक व मुलांची हेळसांड चालू आहे. या प्रश्नावर ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका सुरू केल्याने मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शिक्षण मंडळ प्रशासनाची सोमवारी सकाळी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत प्रवेशाचा आढावा घेतला.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक प्रवेशाची प्रक्रिया आरटीई कायदा मोडून झाली असेल तर प्रशासन काय करत होते? असा सवाल गुडेवारांनी कांबळे यांना केला. ज्या शाळा शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश देत नसतील.
प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा ठेवत नसतील, तर त्यांच्यावर काय
कारवाई करता येते ते पाहा. कायदा न जुमानणार्‍या शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण सचिवांना करू. कारवाई करताना मोठय़ा शाळांची प्रथम तपासणी करा, असे फर्मान गुडेवार यांनी सोडले. या वेळी बैठकीस प्रशासनाधिकारी कांबळे, पर्यवेक्षक शिवाजी शेटे, एम. एस. बांगर आदी उपस्थित होते.