आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दायमांचे शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते महेश कोठे आणि माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यापाठोपाठ चंद्रकांत दायमा यांनी जाहीर सभा घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन केले. या जाहीर सभेला तरुणांची मोठी गर्दी होती. आम आदमीला काँग्रेसनेच खरी ताकद दिल्याचे सांगून आ. प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस धोरणावर भाष्य केले.

काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त शहर कॉँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसच्या वतीने टिळक चौक येथे शनिवारी संध्याकाळी जाहीर सभा झाली. या वेळी मंचावर ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, आमदार दिलीप माने, माजी मंत्री आनंदराव देवकते, शहराध्यक्ष धर्मा भोसले, माजी महापौर आरिफ शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य दायमा यांनी केले. कार्यक्रमापूर्वी देशभक्तिपर गीत सादर करण्यात आले. शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी आभार मानले.

या वेळी शिवलिंग कांबळे, तौफिक शेख, जगदेवी नवले, श्रीदेवी फुलारे, सुशीला आबुटे, अमोल शिंदे, विनोद भोसले, अजमल शेख, विवेक खरटमल, सिध्दराम चाकोते, सुमन जाधव, इंदूमती अलगोंडा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दायमा यांनी उडविली मोदी यांची खिल्ली
सोलापुरात ‘ना मोदी ना आडम, यहाँ सिर्फ सुशीलकुमार की ही चलेगी’. आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळेच शहर मध्यमध्ये भरीव असा विकास होत आहे. नागरिकांकडून पैसे वसूल करणारे आडम मास्तर लोकांची सेवा कशी करणार, असा सवाल चंद्रकांत दायमा यांनी करीत विरोधकांची खिल्ली उडवली.