आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Change In Confidence By The People Toon Senior Researcher Dr.. Sounkhe

परिवर्तनातून लोकांमध्ये आत्मविश्वासाची निर्मिती - ज्येष्ठ संशोधक डॉ. साळुंखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-गौतम बुद्धांनी समाजातील दु:ख दूर करण्यासाठी अष्टांग मार्गाच्या माध्यमातून प्रथम विचार मांडला. कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेता संतुलित मार्गाचा अवलंब केला. केवळ समस्या न सांगता उपाय सुचवला, अशा परिवर्तनातूनच बुद्धांनी सामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. परिवर्तन अकादमी आणि मित्र मंडळाच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे तथागत बुद्ध : एक आकलन या विषयावरील व्याख्यानाच्या दुसर्‍या दिवशी साळुंखे बोलत होते.
साळुंखे म्हणाले, ‘बुद्धांनी केव्हाही टोकाची भूमिका घ्या, असे सांगितले नाही. त्यातून एक मध्यम मार्ग काढावा. हा मध्यम मार्गच सर्व दु:ख दूर करणारा आहे. दु:खं अनेक प्रकारची असू शकतात. मात्र, बुद्ध केवळ दु:ख आहे म्हणून त्याला कुरवाळत बसले नाहीत. तर त्या दु:खाचे कारण शोधण्यासाठी बाहेर पडले. दु:खाच्या निराकरणाचे उपाय सांगून अष्टांग मार्गाचा महत्त्वपूर्ण मार्ग त्यांनी आपल्याला दिला.’
चमत्कारांना विरोध
गौतम बुद्धांचा चमत्कार व कर्मकांडाला तीव्र विरोध होता. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या वाईट प्रथा निर्भयपणे मोडित काढल्या. शुभ किंवा अशुभ असे काहीही नसते, असा विचार गौतम बुद्धांनी दिला.
क्रोध सोडा
क्रोधामुळे नुकसान होते. बुद्धांएवढा संयमी माणूस आजतरी होणे नाही. सम्यक ठेवला तर फायदा होतो. संवाद चांगल्या पद्धतीने केला तर सर्व मार्ग मोकळे होतात. चागंले वागा, निट बोला व दु:ख दूर करा, असा त्रिसूत्री मार्ग सांगितला.
भाषा गुलाम बनवते
भाषा गुलाम बनवते. स्वतंत्रही करते. तलवारीपेक्षाही जिभेने हिंसाचार जास्त केला. आधी जीभ चालते व नंतर बुद्धी चालते. वाणीमध्ये अनेक प्रकारचे गुण व दोष आहेत. त्यामुळे आपली भाषा किंवा बोलणे सम्यक असेल तर सर्व प्रश्न सुटतील.
धम्माचा मानवी वारसा नाही, तर माझ्या विचारांचेच आचरण करा.
ज्ञानाची प्राप्ती अंतिम ध्येय, विचारांचा दैनंदिन जीवनात उपयोग करा.
बोधी आणि धम्म एकाच नाण्याच्या बाजू, धर्माच्या चाकोरीत माणूस मुक्त.
भाषा, आचरण शुद्ध असावे, जगायचे असेल तर चांगल्या अर्थाने जगा.