आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changes In English Question Paper Pa Tern Of 10th Class

इंग्रजी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेच्या रचनेत (पॅटर्न) बदल झालेला अहे. पुणे बोर्डाच्या संकेतस्थळावर नव्या रचनेतील नमुना प्रश्‍नपत्रिका देण्यात आली आहे. शाळेतील इंग्रजी शिक्षकांना मात्र बदललेला पॅटर्न माहीत आहे, या नव्या बदलाची दखल घेत त्यानुसार विद्यार्थ्यांना सूचनाही दिलेली आहे, असे रावजी सखाराम प्रशालेचे प्राचार्य दिलीप पाटील यांनी सांगितले. काही बदलासाठी बोर्डाच्या संकेतस्थळावरच्या सूचना पुरेशा असतात, असे ते म्हणाले.

असा आहे बदल
कामतकर क्लासचे संचालक सुनील कामतकर म्हणाले, की अभ्यासक्रमात बदल नाही. प्रश्नपत्रिकाचे रचना बदलली आहे. प्रश्‍नपत्रिकेत परिच्छेद दिला जाईल, तो वाचून त्यावरचे प्रश्‍न, त्यातील व्याकरणावरील प्रश्‍न असा अतिशय उत्तम पॅटर्न आहे.

परिपत्रक नाही
दहावीतील पेपर पॅटर्न बदलाबाबतचे शासन परिपत्रक अद्याप मिळालेले नाही. ’’ विद्या शिंदे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
अभ्यासक्रम बदलानंतर झालेल्या प्रशिक्षणावेळी प्रश्‍नपत्रिकेच्या बदलणार्‍या पॅटर्नबाबत सूचना देण्यात आली होती. मात्र, नव्याने कोणतीही सूचना प्राप्त नाही.’’ तानाजी बागल, इंग्रजी विषय शिक्षक, उळे