आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिनियमांत बदल: वाहन अधिनियम कडक, चालणार नाही ‘बेधडक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्याचे नियम तब्बल १० पट अधिक कठोर करण्यात आले आहेत. आता विनापरवाना वाहन चालवल्यास १० हजार रुपये दंड किंवा गाडी जागेवरच जप्त होईल. कागदपत्रे नसल्यास हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकावर संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल.
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पदभार घेताच, मोटार वाहन कायद्यात बदल करण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तज्ज्ञांची समिती िनयुक्त केली. त्यांनी सुचवलेल्या शिफारशींनुसार अधिनियमांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नव्या िनयमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास हजार रुपये तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड घेण्यात येईल. परवाना नसताना वाहन चालवणाऱ्याकडून १० हजार रुपये, धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास २५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विनानोंदणी वाहन चालवल्यास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. हीच चूक दुसऱ्यांदा घडल्यास ५० हजार रुपये दंड म्हणून भरावे लागतील. या शिवाय संबंधित वाहन वितरकाकडून एक लाख रुपयांचा दंड घेतला जाणार अाहे. वाहनाचा विमा नसल्यास दुचाकीस २५ हजार रुपये दंड होईल. मद्यपी चालकास सहा महिन्यांची कैद सुनावण्याची तरतूदही आहे.
आता पेनल्टी सिस्टिम
वाहतुकीच्यानियमांचे उल्लंघन केल्यास पेनल्टी सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या नियमांनुसार पेनल्टीचे गुण ठरवण्यात आले आहेत. पेनल्टीचे १२ गुण झाल्यास चालकाचा परवाना निलंबित होईल. त्यानंतर पुन्हा १२ गुणांची पेनल्टी मिळाल्यास परवाना पाच वर्षांसाठी रद्द करण्यात येईल, तर शिकाऊ वाहनचालकास चार गुणांची पेनल्टी मिळाल्यास त्यांचा परवाना रद्द होणार आहे.