आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changing Lifestyle And Tension Causing Rise In Heart Diseases

आधुनिक पद्धतीच्या उपचारांमुळे रुग्णांना मिळतोय दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हृदयरोग हा पश्चात लोकांत आढळणारा आजार म्हणून पूर्वी भारतीय लोकांची मानसिकता होती. पण हळूहळू या आजाराचा धोका भारतातही वाढू लागला. बदलती जीवनशैली आणि मानसिक ताणतणाव या आजारामागील कारणे समजली जात असली तरी नियमित व्यायाम, व्यसनापासून दूर राहणे, नियमित तपासणी केल्यास हृदयविकार आपण टाळू शकतो. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार्‍या उपचारांमुळे रुग्णांना दिलासा मिळतो, असे मत शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल
पाश्चात्य देशात प्रामुख्याने आढळणारा हृदयरोग हळूहळू भारतात आला. देशात हदय रोगाचे रुग्ण वाढत आहेत. 25 ते 40 वयोगटात हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. ताणतणाव व बदलती जीवनशैली हे यामागचे प्रमुख कारण आहे. रुग्ण जसे वाढले तसेच या आजाराच्या उपचारपद्धतीतही आमूलाग्र बदल घडून येत आहे. पूर्वी रक्त पातळ करण्यासाठी औषधोपचार, शस्त्रक्रियेसाठी छातीत मेटल बसवला जात होता. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे मेटलऐवजी अँबसार्ब स्टंट वापरले जाते. मेटल विरहित असलेला हा पदार्थ वर्ष-दीड वर्षात आपोआप विरघळून जातो. हा बदल महत्त्वाचा असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनुपम शहा यांनी सांगितले.

डॉ. गुरुनाथ परळे
सोलापुरात आठ ते दहा टक्के हृदयविकाराने त्रस्त रुग्ण आहेत. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारावर नियंत्रण नाही या सर्र्वांचे मूळ कारण म्हणजे हृदयविकार. आधुनिक उपचार पद्धतीमुळे हृदयविकाराचे लवकर निदान होत आहे. बिनटाक्याची अँजिओप्लास्टी रुग्णांना दिलासा देणारी ठरतेय. स्निग्ध व चरबी वाढणारे पदार्थ खाऊ नयेत. बीपी, शुगर आजार असणार्‍यांनी धुम्रपान करू नये. बायपास सर्जरीही यशस्वी होत आहेत. शरीरात रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून नियमित औषधोपचार घ्या. कोलेस्टेरॉलमुळे लवकर आजार वाढतो. शिवाय पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्येही लठ्ठपणा वाढतोय. त्यांना सिग्नध पदार्थ शक्यतो देऊ नयेत. मुख्य म्हणजे, व्यायाम, आहारावर नियंत्रण आल्यास हृदयविकारावर नियंत्रण आणता येते.

डॉ. रिझवान उल हक
हृदयरोग झाल्यानंतर उपचाराशिवाय पर्याय नसतोच. त्यामुळे हा आजार होऊच नये याकरिता सुरुवातीपासून काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयरोग होऊ नये याकरता मार्गदर्शन करणारी शिबिरे, रॅली, पत्रके आदी माध्यमांचा वापर केला जातो. पण त्याच बरोबर स्वत: घेतलेली काळजी महत्त्वाची आहे. शुगर आणि बी.पी. वर नियंत्रण ठेवणे, स्थूलपणा वाढू न देणे, सिगारेट आणि तंबाखू सेवनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम , कामाचा तणाव न घेणे आदी गोष्टींची काळजी घ्या. ही काळजी फक्त पुरुषांनीच न घेता महिला आणि मुलांनीही घ्यावी. कारण मुलांची काळजी आतापासूनच घेतली की उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल.