आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्ह्यातील 20 छावण्या झाल्या बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हाधिकार्‍यांनी पंधरा दिवसांपूर्वी चारा छावण्यांच्या अचानक केलेल्या तपासणीने छावणी चालकांचे धाबे चांगलेच दणाणले असून आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील 20 छावण्या बंद आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी तहसीलदारांचे पथक नियुक्त करून चारा छावण्यांची तपासणी केली. त्यामध्ये काही छावण्या कागदोपत्री सुरूअसल्याचे, तर काही छावण्यांमध्ये जनावरांची संख्या कमी असल्याचे आढळले. तब्बल 325 छावण्यांमध्ये पाच हजारांपेक्षा कमी जनावरे आढळली. त्याप्रकरणी संबंधित छावणी चालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे काही छावण्या बंद झाल्याची चर्चा आहे. पण, पावसामुळे गवताची चांगली वाढ व खरिपाच्या मशागतीची कामे सुरू असल्याने छावण्या कमी होत असल्याचे कारण काही छावण्या बंद करण्यासाठी देण्यात येत आहे.

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने चारा व पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. जनावरांच्या चार्‍याची समस्या निर्माण झाल्याने ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात चारा डेपो सुरू झाले. चार्‍याचा प्रश्न तात्पुरता सुटल्यानंतर पाण्याची टंचाई वाढली. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून चारा छावण्या सुरू आहेत. सध्या जिल्ह्यातील 304 छावण्यांमध्ये दोन लाख 42 हजार जनावरे आहेत. जिल्ह्यात सर्वांधिक 94 छावण्या सांगोला तालुक्यात सुरू आहेत.