आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न तपासणीनंतरच मिळेल शिधापत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी नवीन शिधापत्रिका देताना संबंधित अर्जदाराच्या उत्पन्नाची तपासणी करावी, असा आदेश राज्याच्या अन्न, नागरी व पुरवठा विभागाने काढला आहे. यामध्ये शिधापत्रिका वितरित करताना उचित कार्यपद्धती ठरवण्यासाठी मुख्य सचिव लक्ष घालणार आहेत.
बार्शी तालुक्यातील बोगस शिधापत्रिका रद्द करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे एल.बी. शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशनुसार आता नवीन शिधापत्रिका देताना अर्जदाराच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. तसेच शिधापत्रिका वितरित केलेल्या अर्जदारांचीही यामध्ये तपासणी होण्याची शक्यता आहे.
रँडम पद्धतीने होईल तपास
बनावट शिधापत्रिका शोधमोहिमेव्यतिरिक्त वितरित करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची दक्षता समितीच्या सहभागाने रँडम पद्धतीने तपासणी करावी. यामध्ये शिधापत्रिका वितरणातील अनियमितता व त्रुटीस जबाबदार असणार्‍या आणि गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करावी.
आता अशी होणार तपासणी
बोगस वा बनावट शिधापत्रिका वितरण होऊ नये यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये अर्जदाराने अर्ज केल्यावर अर्जासोबत जोडलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे, गृहभेटी देणे व पडताळणीअंती शिधापत्रिका वितरित करावी.
हे उत्पन्न ग्राह्य धरावे
शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचे तसेच अन्य खासगी आस्थापनांमधील कामगार, कर्मचार्‍यांचे त्यांच्या कार्यालयांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे किंवा सन 2011 पासून सुरू झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षणातील संबंधित कुटुंबाची उत्पन्नविषयक माहिती ग्राह्य धरावी.