आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारी बांधवांची सूर्योपासना सुरू; कार्तिक शुक्ल षष्ठीला आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भारतात प्रांतानुसार व्रतवैकल्ये केली जातात. परंतु व्यवसाय आणि कामानिमित्ताने स्थलांतरित झालेली कुटुंबे आजही ती कर्तव्ये पार पाडतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. देशभरात जशी छटपूजा साजरी केली जाते. सोलापुरातही अशाच काही बिहारमधून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी बुधवारी सूर्योपासना सुरू केली.

छटपूजा म्हणजे काय?

उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे पूजन म्हणजेच छटपूजा होय. मुख्यत: बिहार, झारखंड, पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये हा सण साजरा केला जातो. षष्ठी शब्दाचा प्रारंभ होत याचे नाव छठपूजा असे पडले. भाऊबीजेनंतर या उत्सवास सुरुवात होते.

कशी होते साजरी

पहिल्यादिवशी सैंधव मीठ, तुपामध्ये बनवलेला भात, भोपळ्याच्या भाजीचा प्रसाद दुसर्‍यादिवशी उपवास, सायंकाळी तांदळाची खीर बनवली जाते. तिसर्‍यादिवशी मावळत्या सूर्यास दूध किंवा पाण्याने अघ्र्य दिले जाते. व्रतात पूर्णपणे 36 तास उपवास आणि कांदा, लसूण वज्र्य असते

छटपूजेची आख्यायिका

सुखशांतीकरिता हे पूजन केले जाते. जेव्हा पांडव जुगारात राजपाट हरले, तेव्हा द्रौपदीने हे व्रत केले. तेव्हा कुठे पांडवांना आपले अधिकार प्राप्त झाला. सूर्यदेव, माता छटी यांचे बहीण-भावाचे नाते मानल्यानेही यास महत्त्व आहे.
पंडित पंकजमहाराज