आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात चिकन 65, खिमा सामोसा आणि शीक कबाबच्या मागणीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रमजानचा महिना सुरू झाला की, विजापूर वेस आणि बेगम पेठेमध्ये विविध मांसाहारी खाद्यपदार्थ पाहायला मिळतात. त्यामुळे खवय्यांची या महिन्यात चांदीच झाली आहे.

रमजान महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत विजापूर वेस, बाराईमाम चौक, बेगम पेठ, पेंटर चौक, किडवाई चौक आदी भागात मसालेदार मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लावले जातात. तसेच काही हॉटेलमध्ये रमजान स्पेशल डिशेसची सोय केली जाते. चिकन कबाब, चिकन 65, चिकन तंदुरी, चिकन चिल्ली, चिकन सामोसा, खिचडा, शिक, खिमा समोसा, चिकन बिर्याणी, चिकन मसाला, चिकन अचार आदींसह अनेक पदार्थ येथे खायला उपलब्ध असतात. यामध्ये जास्तप्रमाणात विक्री होते, ती शीक, खिमा सामोसा आणि चिकन 65 या पदार्थांची.

चिकन 65ला मागणी वाढली
रमजान महिन्यात तुलनेने चिकन 65 या पदार्थाला चांगली मागणी असते. दररोज 50 किलो किमान विक्री होते. त्याचप्रमाणे खिमा सामोसाची मागणी असते. सकाळी अकरापासून ते रात्री अकरापर्यंत भटारखाना चालूच असतो. उपवास सोडण्यासाठी हा पदार्थ घेतात.
-महिबूब शेख, मॅनेजर, ताजोद्दीन हॉटेल

खानसामांची वाढली मजुरी, कामगारांचे वधारले भाव
रमजान महिन्यात मजुरांच्याही उत्पन्नात वाढ होते. कुठल्याही सामोशासाठी 20 रुपये प्रतिशेकडा मजुरी दिली जाते. तसेच चिकन 65 आणि चिकन तंदुरी तयार करणार्‍या बावर्चीला दररोज 350 रुपये मजुरी ठरलेली आहे. अनेक लोकांना या महिन्यात रोजगार मिळतो, अशी माहिती ताजोद्दीन हॉटेलचे निजाम मुल्ला यांनी दिली.