आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी, सोमवारी सोलापुरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन आहे. रविवारी (दि. २४) सायंकाळी कोल्हापूरहून सोलापूर मुक्कामी येत आहेत. यानंतर सोमवारी सकाळी जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन जलशिवार मोहिमेच्या कामाची पाहणी करतील आणि त्यानंतर सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम दौरा आज म्हणजेच शनिवारी सायंकाळी येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस दुसऱ्यांदा सोलापूरला येत असले तरी मुक्कामी मात्र पहिल्यांदाच येत आहेत. जलयुक्त शिवार मोहिमेतील कामांची पाहणी करण्यासाठीच मुख्यमंत्री यांनी जिल्ह्याची निवड केल्याचे समजते. अधिकृत दौरा प्राप्त झाल्यानंतरच मुख्यमंत्री यांचे कार्यक्रम कळणार आहेत. रविवारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष, ऊर्जामंत्रीही सोलापुरात
सोमवारीमुख्यमंत्री यांच्याशिवाय विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर आहेत. तीन कॅबिनेट दर्जाचे अधिकारी सोलापुरात शहरात असल्याने पोलिस महसूल प्रशासनाची चांगलीच धावपळ होणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...