आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम आरोग्यासाठी मिळणार आता घरोघरी ‘संजीवनी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना विशेषत: महिला व बालकांना उत्तम व दज्रेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2013-14 वर्षापासून जिल्ह्यात ग्राम आरोग्य संजीवनी योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. समाजातील सर्व घटकांना आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवरच विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम)या अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू महिला, मुले, अपंग व्यक्ती, बालक, किशोरवयीन मुली यांच्यासाठी ग्राम आरोग्य संजीवनी योजना आहे.

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे
यशश्री लेक वाचवा योजनेंतर्गत स्त्री अपत्य असलेल्या दाम्पत्य तसेच गरोदर महिलांचे पालकत्व घेणे, गर्भपात व गर्भलिंग तपासणी करू नये म्हणून आरोग्य दूत म्हणून जबाबदारी सोपवणे यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. शिवाय गैरप्रकार घडल्यास जिल्हा आरोग्य अधिकार्‍यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून कळवले जाणार आहे. तसेच 25 हजार रोख रक्कम बक्षीस व संबंधित स्वयंसेविकांचे नाव गुप्त ठेवण्याची हमी आहे.

सुविधा देण्याचा प्रयत्न
2013-14 या वर्षात नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद सेस फंड, डी. पी. डी. सी. व केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची एकत्रित सांगड घालून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी जि.प. आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

गावकर्‍यांचा सहभाग
ग्रामपातळीवर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजातील विविध घटकांची मदत घेतली जाणार आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, युवक, सामाजिक संस्था, युवती संघटना, महिला बचत गट आणि समाजातील घटक या योजनेत सहभागी करण्याचा संकल्प आहे.

काय असणार या योजनेत
माता मृत्यू दर कमी करणे, बाल व अर्भक मृत्यू दर कमी करणे, शासकीय आरोग्य केंद्रामधील प्रसूतीचे प्रमाण वाढवण्याबरोबरच सुरक्षित प्रसूती योजना, आरोग्यदायी व सुरक्षित मातृत्व योजना, किशोरवयीन मुलींसाठी रक्तक्षय मुक्त किशोरी योजना, अक्षय जीनदायी योजना, यशश्री लेक वाचवा अभियान, दृष्टी संजीवनी योजना या प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्राम आरोग्य संजीवनी योजनेंतर्गत होणार आहे.

दुर्बल घटकांना लाभ
ग्राम संजीवनी योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधेतील विविध लाभ घेणे शक्य होणार आहे. काही विशेष प्रकरणात अर्थसहाय्य आणि सुविधा अशी ही योजना क ाम करणार आहे. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य साहाय्यक अधिकारी