आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकामगार प्रथा मुक्तीचे आव्हान सोलापूरकरांनी पेलण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बालपण म्हणजे आयुष्यातील सर्वात सुंदर कालावधी. बालपणीचा काळ सुखाचा, बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या पंक्तीही बालपणाचे महात्म्य सांगतात. सुशिक्षित व सुस्थितीतील पालकांच्या मुलांना हे सुख मिळतंच पण तशी विकासाची आणि संरक्षणाची संधी दारिद्रय़, अन् परंपरागत चालीरीती यांच्या बंधनात अडकलेल्या पालकांच्या मुलांना मिळत नाही. त्यामुळे बालकामगार मुक्त सोलापूर हे विकासात्मक आव्हान आहे. ते पेलण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत. बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने हा शब्दप्रपंच.

विकसनशील भारत देशात लोकसंख्येच्या 40 टक्के संख्या बालकांची आहे. बालकांच्या समस्या अगणित आहेत. 14 वर्षांखालील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे, अशी आपल्या राज्यघटनेत तरतूद आहे. तरीही गरिबी, रोगराई, बेरोजगारी आणि महागाई या विवंचनेत कुटुंबातील मुला-मुलींना बालपणात काम करावे लागते. सोलापूर शहरात मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 2,500 बालकामगार आढळले आहेत. खेळण्या-बागडण्याचं वय असलेली मुले कचरा वेचणे, विडी काम करणे व बांधकाम क्षेत्रात काम करताना आढळलेली आहेत. देशात बालकामगारांचा आकडा दीड कोटी तर महाराष्ट्रात साडेसात लाख इतका आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक बालमजूर नागपूर त्यानंतर सोलापुरात आढळून येतात. दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांचे निष्पाप कोवळे हात अतिर्शमाने दगडासारखे घट्ट बनतात. वीटभट्टी, हॉटेल, बांधकाम अशा क्षेत्रांत ही कोवळी मुले आपलं बालपण परिस्थितीने गांजल्याने करपून टाकतात हे विदारक चित्र आहे. 21 व्या शतकात महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या भारत देशातील भावी नागरिकाला लहान असल्यापासून काम करावे लागत आहे. कायद्याने 14 वर्षांपर्यंत सक्तीचे शिक्षण आहे. परंतु दुसरीकडे पोटासाठी ही मुले बालकामगार म्हणून शिक्षणबाह्य राहतात. ही भीषणता आहे. (लेखिका राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, सोलापूरच्या संचालिका आहेत.)

सोलापूरचा बालकामगार प्रकल्प 17 वर्षांचा
राज्यघटनेत बालकांच्या संरक्षणाच्या विविध तरतुदी आहेत. बालमजुरी विरोधी कायदे आहेत. याशिवाय देशात 266 जिल्ह्यांत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आहेत. सोलापुरातील प्रकल्पाने 17 वर्ष पूर्ण केलेले आहेत. जिल्ह्यात 9,555 बालकामगार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल आहेत. विशेष म्हणजे, शिक्षणाचा हा वसा त्यांनी पुढे अखंड ठेवला आहे. आता त्यांच्या यशोगाथाही सर्वांना मार्गदर्शक ठरत आहेत. बालमजुरीविरुध्द सरकारने काय करावे, त्याचा आपला काय संबंध? या मानसिकेतून समाजाने आता बाहेर पडायला हवे.

कौन्सिलिंगची जबाबदारी
मागील वर्षी सर्वेक्षणात 2,500 बालकामगार मुले आढळली. या मुलांचे पुनवर्सन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ज्यांनी कामावर ठेवले होते, त्यांच्याविरुध्द कारवाई केलेली नाही. सर्वेक्षणात ज्यांच्याकडे मुले आढळली, त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी सहाय्यक कामगार आयुक्तालयाची आहे.

नागरिकांनी शपथ घ्यावी
प्रत्येक सजग नागरिकाने आपल्याला आवारात 6 ते 14 वयोगटातील बालकामगारांना धोकादायक व बिगर धोकादायक उद्योगापासून परावृत्त करावे. हॉटेल, टपरी व चायनीज गाड्यांवर बालकामगार असतील तर तेथे कोणतेही अन्नपदार्थ न खाण्याची शपथ घ्यावी. हेच पहिले पाऊल असेल.