आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकामगार प्रथा हटाव, बचपन बचाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘डोक्यावर नको ओझ्याची पाटी, हाती द्या शाळेची दफ्तर अन् पाटी’, ‘बालकामगार प्रथा हटाव बचपन बचाव..’ अशा घोषणा देत बालकामगार शाळांतील मुलांनी गुरुवारी फेरी काढली. 12 जून हा ‘जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त ही जनजागृती फेरी काढण्यात आली.
सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फेरीस सुरवात झाली. तत्पूर्वी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विशेष प्रशिक्षण केंद्रात छोटेखानी कार्यक्रम झाला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजीव पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. बालकामगारांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा देऊन शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे आवाहन केले.

बालकामगार निर्मूलन सप्ताह आयोजित केला असून, पालक मेळाव्याने त्याची सांगता होईल, अशी माहिती प्रकल्प संचालक अपर्णा कांबळे- बनसोडे यांनी दिली. या वेळी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्रसिंह लोखंडे, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. प्रशांत नलवडे, विशेष प्रशिक्षण केंद्राचे संचालक अंजुनगीकर, प्रा. संतोष राजगुरू, प्रा. सुरेश ढेरे, डॉ. रावसाहेब ढवण आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेश्मा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
विविध शैक्षणिक उपक्रमांनी बालकामगार प्रकल्पाला नवी दिशा मिळाली आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुनर्वसनाचे कामही सुरू झाले. जागतिक संस्थेने यंदाचे वर्ष बालमजुरी आणि सामाजिक सुरक्षाविषयी उपायांचे सांगितले आहे. अपर्णा कांबळे, प्रकल्प संचालक