आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात चिमुकल्यांच्या मदतीला पुन्हा येणार चाइल्ड लाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अनाथ,घरचा रस्ता चुकलेेले बालक बािलका, गैरवर्तन करणारी मुले यांच्या मार्गातील सर्व संकटे दूर करणारी चाइल्ड लाइन सेवा आता नव्या वर्षापासून पुन्हा सुरू होणार आहे. वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स आणि सहकारी संस्था अक्कलकोट एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात चाइल्ड लाइन ही संस्था काम करत असे. परंतु गेले वर्षभवर सेवा व्यवस्थापनातील समस्येमुळे ही संस्था बंद पडली होती. परिणामी या काळात अनेक चिमुकल्यांचे मोठे हाल झाले.
अनेक मुले-मुली घरचा रस्ता चुकतात, काही गुन्हेगारीकडे वळलेले असतात. काही अनाथ असतात तर काही बड्या घरची मुलेही आपल्या काही खुळ्या कल्पना घेऊन घराबाहेर पडतात. अशा मुलांचे सुमपदेशन करणे, त्यांना त्यांच्या घरी पाहोचवणे अथवा बाल कल्याण समितीकडे सोपविणे आदी कामे चाइल्ड लाइन करत असे.

अखंड सेवा सुरू राहणार
^नव्यानेसुरू होणाऱ्या चाइल्ड लाइनचे स्वरूप उत्तम असणार आहे. त्यामुळे ही सेवा अखंड असणार अाहे. ज्या मुलांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे त्यांना या सेवेच्या माध्यमाने मदत करणे शक्य होणार आहे. सपनापाटील, संचािलका,चाइल्ड लाइन, सोलापूर जिल्हा समाजिक समिती

वर्षभरापासून बंद असलेली सेवा एक जानेवारीपासून पुन्हा होणार सुरू, अनाथ बेघर मुलांसाठी सुलभ सेवा, १०९८ हीच हेल्पलाइन
केंद्र प्रमुख, समुपदेशक व्यवस्थापक असे या कार्यालयाचे स्वरूप असणार आहे. १०९८ हीच हेल्पलाइन या केंद्राची असणार आाहे. मुळातच समुपदेशनाच्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या चाइल्ड लाइनने आपल्या स्वरूपात बरेच बदल केले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या या केंद्राचे स्वरूप हे जुन्या केंद्राच्या तुलनेने अधिक गतिमान असेल. पाेलिस विभाग बाालकल्याण समितीच्या कामासाठी चाइल्ड लाइन पूरक ठरणार आहे.
चाइल्ड लाइन सेवा सुरू झाल्यास शहरातल्या शहरात हरवलेल्या मुलांना घरी पोहोचवणे, त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या पुनर्वसनाची कामे करणे आदी कामे चाइल्ड लाइनचे समुपदेशक स्वयंसेवक करतात. त्यामुळे प्रकरणे खूप लांबत जाता थेट समुपदेशनाच्या स्तरावर मिटवण्याचे काम होते. त्यामुळे मुलांचे होणारे हाल थांबतात.