आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅडम, राजकारण म्हणजे भ्रष्टाचार अन् वाईटच ना...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मॅडम,आम्ही करिअरचा विचार करतो. राजकारणातही जावेसे वाटते, पण राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनागोंदी असे वाईटच ना... एका मुलाने प्रश्न केला. उपस्थित मॅडम विचार करून म्हणाल्या, “बाळा, राजकारणाला वाईट बनवले गेले. प्रत्यक्षात राजकारण वाईट नाही. समाजकारण म्हणून पाहावे लागेल. तिथे चांगल्या माणसांची गरजच आहे.” त्यानंतर दुसरी मुलगी म्हणते, “स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांना मारलेच पाहिजे. तसं कुणाला मारणं वाईटच ना...?” मुलांचे असे अनेक प्रश्न होते, राजकारणावर, समाजकारणावर, शिक्षणावर. त्यांच्या मनोभावविश्वाला जणू धुमारे फुटले होते. िनमित्त होते बालदिनाच्या कार्यक्रमाचे.

गुरुवारी सायंकाळी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात बालदिनानिमित्त एक खुले मंच आयोजित केले होते. त्यात १० मुले सहभागी झाली होती. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील आठवी ते दहावीतील ही मुले होती. हरिभाई देवकरण प्रशाला, दमाणी विद्या मंदिर, रावजी सखाराम प्रशाला, सेंट जोसेफ आणि िहंदुस्थान कॉन्व्हेंटमधील ही मुले होती. मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. घर, शाळेत ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, अशांसाठी हे एक खुले बालमंच होते. मुलांना उत्तरे देण्यासाठी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यूआयटी)च्या लता मोरे आणि दमाणी विद्या मंदिरच्या पर्यवेक्षिका ज्योत्स्ना मळेकर. मुलांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांना काही टिप्स दिल्या.

समाजकारण हाच पाया
समाजकारणहाच राजकारणाचा पाया असला पाहिजे. डॉ. प्रकाश बाबा आमटे हे सामाजिक कार्यकर्तेच आहेत. त्यांनी केलेले कार्य देशासमोर आदर्श म्हणूनच उभा आहे. असे आदर्श ठेवून राजकारणात जायला हरकत नाही. राजकारणातही सारेच काही वाईट आहे, असेही म्हणणे योग्य नाही. कारण, तिथे सामान्यांची कामे असतात. िनस्पृहपणे काम केले तर एक चांगला राजकीय नेताही होते येते. समाजातल्या काही अपप्रवृत्तीही कायद्याच्या माध्यमातून रोखता येतील. जसे स्त्रीभ्रूण हत्या रोखणे शासनाच्या हाती आहे. शासन चालवण्यासाठी चांगल्या नेत्यांची गरज आहे.