आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Choice Travel Agency Municipal Corporation Issue Solapur

विषयाला मंजुरी सर्वांची, अन् दोषी फक्त मी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चॉइस ट्रॅव्हल्स एजन्सीला 20 बस पुरवण्याचा मक्ता देताना परिवहन समिती, मुख्य लेखापरीक्षक, विधान सल्लागार यांचा आक्षेप नव्हता. एकंदरीत सर्वांची या विषयाला मंजुरी होती. असे असताना फक्त मलाच दोषी धरून शिक्षा का सुनावण्यात आली, असा प्रश्न सहाय्यक आयुक्त अजित खंदारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

चॉइस ट्रॅव्हल्स एजन्सीने कमी दर दिले होते. तसेच त्यांनी फर्मचे नाव बदलण्यात आल्याची कबुली पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिली. टेंडर देताना फक्त फर्म बघितले जाते मालक नव्हे. हा विषय मी एकट्याने मंजूर केला नाही. याचे सर्व अधिकार माझे असताना मी तो विषय परिवहन समितीकडे दोन वेळा पाठवून दिला. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य लेखापरीक्षकांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर काहींनी विधान सल्लागार यांचाही अभिप्राय घेतला. जर हा विषय बेकायदेशीर असला असता तर या दोघांनी या विषयावर आक्षेप घेतला असता. सर्वकाही योग्यरीत्या असताना माझ्यावर ठपका ठेवून माझ्या निलंबनाचा ठराव करण्यात आला, अशी खंत र्शी. खंदारे यांनी व्यक्त केली.

नोंदीची पोलिसांत चौकशी करा
बस डेपो मधील चोरीबाबत सांगताना ते म्हणाले, मी गुन्हा दाखल केला नाही असे चुकीचे आरोप माझ्यावर करण्यात आले. मी तीन वेळा चोरीबाबत गुन्हा दाखल केला आहे. ज्यांना माझ्या शब्दावर विश्वास नाही त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन पाहावे.

परिवहनची आर्थिक बाजू उत्तम
परिवहनच्या डबघाईबाबत ते म्हणाले, मी फेब्रुवारी 2011 मध्ये परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी परिवहन पाच ते सहा लाख रुपये तोट्यात होती. मी डिसेंबर 2012 रोजी जबाबदारीतून मुक्त झालो तेव्हा परिवहन पंधरा लाख रुपये फायद्यात होती. माझ्या कार्यकाळात तर परिवहन उजिर्तावस्थेत होती. सध्या डबघाईत का आली मी काय सांगणार.’’ अजित खंदारे, साहाय्यक आयुक्त