आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Choose A Career Path After HSC, Said Principal Dr. Abhijit Auti

बारावीनंतरच निवडा करिअर मार्ग- प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बारावीनंतर अभियांत्रिकीतील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यंानी करिअर निवड करताना आपल्या अावडीची शाखा निश्चित करावी, त्यातूनच करिअर पाथ तयार होतो, असे मत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांनी आज येथे व्यक्त केले.
व्हीआयटीतर्फे येथील अॅम्फी थिएटरमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्री. औटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. अभियांत्रिकीतील करिअर हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रवेशासंदर्भात व्हीआयटीचे सिव्हिल विभागप्रमुख प्रा. किशोर तापसकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. तापसकर म्हणाले, कॅप राऊंड एक मध्येच जवळपास ८० ते ९० टक्के प्रवेश होतात. दुसऱ्या तिसऱ्या कॅप राऊंडची वाट पाहत बसल्यास प्रवेश संधी गमावण्याची शक्यता जास्त असते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीत खुल्या वर्गातील विद्यार्थ्याला पीसीएम ग्रुपला कमीत कमी १५० गुण हवेत, तर राखीव जागेसाठी कमीत कमी १३५ गुण हवेत. पीसीएमचे गुणांची बेरीज कमी होत असेल तर बॉयोलॉजी, बायाेटेक, व्होकेशन यापैकी एका विषयांतील गुणांसह १५० गुण झाले तरी प्रवेश पात्र धरले जाते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी करिअर विषयी आपल्या अडचणी मांडल्या.डॉ. औटी प्रा. तापसकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच करिअर निवडताना आवड लक्षात घेण्याचे सांगितले.
व्हीआयटी अंतर्गत शिक्षणाची संधी
डॉ. औटी म्हणाले, पुणे येथील कामशेत येथे सुमन रमेश तुलशीयानी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना डिग्री प्रवेश प्रक्रियेंतर्गत मेकॅनिकल, िसव्हिल, कॉम्पुटर आणि - टीसी या चार अभ्यासक्रमातून निवड करता येईल. तर डिप्लोमासाठी मेकॅनिकल सिव्हिल या दोन शाखा आहेत. अत्याधुनिक विस्तीर्ण कॅम्पस असणारे व्हीआयटीतून विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा मिळतील.