आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Circle Officer And Talathi Crime Issue In Solapur District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडल अधिकारी सारोळेच्या तलाठ्यासह जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- नाव आणि आडनावातील साम्याचा फायदा घेऊन सन १९८३ मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला १० वर्षे अगोदर मृत झाल्याचे दाखवून सरकारी दफ्तरातील कागदपत्रामध्ये गिरवून खाडाखोड करून मूळ कागदपत्रे गहाळ केली. नऊ एकर ३४ गुंठे जमिनीवर नोंद दाखविल्या प्रकरणी सारोळे (ता. मोहोळ) येथील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह सहा जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी साहाय्यक पोलिस फौजदारांनी फिर्याद दिली आहे.

तालुक्यातील सारोळे येथे राहणारे गणपत भाऊ शिंदे यांची जमीन (गट नं ४३ चे, एकर ३४ गुंठे) ही दादासाहेब गणपत सलगर यांनी सन १९७९ मध्ये खरेदी केली. त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर नावाची नोंद झाल्यामुळे दादासाहेब सलगर हेच वहिवाटून उत्पन्न घेत आहेत. दि. ३१ ऑगस्ट १९८३ रोजी गणपत शिंदे यांचा मृत्यू झाला. त्याबाबत सारोळे ग्रामपंचायत दफ्तरी रजिस्टरमध्ये नोंद आहे. याच नावाशी साधर्म्य असलेली सारोळे गावातील दुसरी व्यक्ती गणपत नामा शिंदे यांचा दि ऑगस्ट १९७३ मध्ये मृत्यू झाला. त्याची ग्रामपंचायत कार्यालयाकडे नोंद आहे. नावात साम्य असल्याचा फायदा घेऊन गणपत भाऊ शिंदे यांची मुलगी पद्मिनी तुकाराम सातपुते, नानासाहेब तुकाराम सातपुते, तुळसाबाई बळीराम चौधरी, सारोळे येथील तत्कालीन ग्रामसेवक आणि ग्रमपंचायत कर्मचारी या सर्वांनी संगनमताने १९८३ मध्ये मृत्यू झालेल्या गणपत भाऊ शिंदे यांच्या नावात खाडाखोड करून ते ऑगस्ट १९७३ रोजी त्यांचा मृत्यू झाला असे दाखिवले. तब्बल दहा वर्षे पाठीमागे मृत्यू झाल्याचे दाखवून गणपत भाऊ शिंदे यांचे १९८३ मधील मृत्यू रजिस्टरमधील पान नंबर एक हे संगनमत करून गहाळ केले. कागदपत्रे गहाळ करून, गिरवून खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सहा जणांवर साहाय्यक पोलिस फौजदार शाहीर सलगर यांनी गुन्हा दाखल केला.
नऊ एकर ३४ गुंठे जमीन लाटण्याचा प्रकार
विद्यमान मंडल अधिकारी एम. एस. वाडेकर आणि सारोळे येथील गाव कामगार तलाठी जयवंत सोंडगे यांनी पूर्वीच्या उताऱ्याला गणपत भाऊ शिंदे यांच्या फेरफार नंबर ९२१ अन्वये १९८४ च्या नोंद अधिकाराचा गैरवापर करून पुन्हा मृताच्या वारसांच्या नावे जमिनीची नोंद केली. गट नं. ४३ मधील एकर ३४ गुंठे ही जमीन विक्री करताना गणपत भाऊ शिंदे हे मृत असल्याचे दर्शवले.