आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय सहलीसाठी सिटीबस स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शाळेच्याएकदिवसीय सहलीसाठी सिटीबस भाडे दीडपट आकारण्यात येते. ते एकपट करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात

आला. नव्याने आलेल्या दहा व्हॉल्व्हो बसच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंपनीकडून काढून घेण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. परिवहन कर्मचाऱ्यांना व्हॉल्व्होच्या देखभालीसाठी प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

समितीची सभा गुरुवारी सभापती आनंद मुस्तारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जेएनयूआरएम योजना अंतर्गत दहा व्हॉल्व्हो बस आल्या असून, त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीत्या कंपनीस देण्याबाबतचा प्रशासकीय प्रस्ताव होता. तीन वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी सहा लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कंपनीसदेखभाल दुरुस्ती देण्याऐवजी परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, असा ठराव करण्यात आला.
सहलीसाठी एकपट आकारणीचा ठराव सदस्य अनिल कंदलगी, दीपक जाधव यांनी मांडला. तो मंजूर झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीना मोफत सिटीबस सेवा

देण्यासाठी राज्य शासनाचे महिला बालकल्याण विभागाकडून परिवहन विभागास अनुदान द्यावे, असा प्रस्ताव करण्यात आला. बाळीवेशीतील जैन गुरुकुलसमोरील सिटीबस

स्टाॅपला ह. भ. प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आली.


व्हॉल्व्होची देखभाल कंपनीकडे नको
नव्यादहा व्हाॅल्व्हो बस आल्या असून, त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीकडे तीन वर्षासाठी िदली असून एक कोटी सहा लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित

आहे. त्याची जबाबदारी परिवहन कर्मचाऱ्यांकडे घेण्याचा ठराव मंजूर झाला आहे.