आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेपाठोपाठ सोलापूरला सर्वाधिक सिटी बस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्र शासनाच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत देशात 146 शहरांची निवड झाली आहे. या शहरांमधील परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी दोन हजार बस केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यात ठाणे महापालिकेपाठोपाठ सोलापूर शहराने अधिकाधिक 200 बस मिळवल्या आहेत. नवीन बस खरेदीसाठी महापालिका टेंडर प्रक्रिया राबवणार आहे. टेंडर नमुना मागवण्यात आल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली.

राज्यात सोलापूर दुसरे
जेएनयूआरएम योजनेअंतर्गत राज्यातील ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या शहरांचा समावेश झालेला आहे. ठाणे शहरासाठी 230 त्यानंतर सोलापुरसाठी 200 बस घेण्यास मंजुरी केंद्राने दिलेली आहे. ठाणे शहराच्या तुलनेने सोलापूरचे क्षेत्रफळ कमी असताना 200 बस मिळालेल्या आहेत.

अशा मिळतील बस
0नवी मुंबई : 195
0सोलापूर : 200
0मीरा-भाईंदर :
100 0ठाणे : 230
0कल्याण-डोंबिवली : 185
सोलापुरात या येतील बस
0मोठय़ा : 145
0मिनी : 35
0एसी : 20

शहरासाठी केंद्राने 200 बसला मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिका बस घेण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करणार आहे. चंद्रकांत गुडेवार, मनपा, आयुक्त