आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Development Plan Committee Selection Issue Solapur

जुळे सोलापूर परिसराचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नगरसेवकांना वगळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुळे सोलापूर विकास आराखड्याच्या विषयावर सुनावणी घेण्यासाठी स्थायी समितीतील सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. मात्र, जुळे सोलापूर भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षातील स्थायी समिती सदस्य नागेश ताकमोगे यांच्यासह नगरसेवक नरेंद्र काळे यांना वगळण्यात आल्याने चांगला वाद पेटला आहे. महापालिकेतील सभागृह नेते महेश कोठे यांनी मुद्दामहून आमची नावे वगळली आहेत, असा आरोप करीत कोठे यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ताकमोगे, काळे यांनी केली आहे.

जुळे सोलापूर भाग एक आणि दोनचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्थायी समितीचे तीन सदस्यांसह अधिकार्‍यांची समिती काम पाहणार आहे. स्थायीचे तीन सदस्यांची नेमणूक करावी म्हणून सभागृहापुढे विषय ठेवला होता. त्यानुसार समिती गठीत झाली.