आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - आगामी 30 वर्षांचा विचार करून शहर विकासाचा सुमारे सात हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात येत असून, त्यात प्रामुख्याने रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. त्यापैकी सुमारे 1396 कोटी रस्त्यासाठी आहे. युनिसन प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी हा विकास आराखडा तयार करत असून त्यासाठी मनपा पदाधिकार्यांकडून सूचना घेण्यासाठी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. कंपनीचे अधिकारी विकास देशपांडे यांनी रस्त्याच्या आराखड्याबाबत माहिती दिली.
श्री. देशपांडे म्हणाले, की युनिसन कंपनीने बारामतीतील रस्त्याचा आराखडा तयार केला असून त्या धर्तीवर सोलापुरातील रस्ते केले जातील. शहर विकास आराखड्यात पाणी, रस्ते आणि ड्रेनेज कामाला प्राधान्य राहणार आहे. सात रस्ता, भय्या चौक, रामवाडी, पुणे नाका, एस. टी. स्थानक परिसरात भुयारी आणि उड्डाणपूल करावे, अशी सूचना या बैठकीत नगरसेवकांनी केली.
शहर विकासाचा आराखडा व खर्च (रक्कम कोटीत)
पाणीपुरवठा आणि वितरण 2295
जलनिस्सारण 2036
पावसाळी गटारी व्यवस्था 774
घनकचरा व्यवस्थापन 476
रस्ते विकास कामे 1396
गरिबांसाठी घरकुल योजना 369
एकूण 7347
उपस्थिती
मनपा सभागृह नेते महेश कोठे, उपमहापौर हारून सय्यद, सभापती इब्राहिम कुरेशी, विरोधी पक्षेनता कृष्णहरी दुस्सा, फिरदोस पटेल.
आराखड्यासाठी होणार पाहणी
शहरातील रस्त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती सभागृहापुढे जाईल, तेथे अंतिम मंजुरी घेतली जाईल. आराखडा तयार करणारी कंपनी शहरात फिरून पाहणी करणार आहे. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त मनपा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.