आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावस्कर कोर्टात; आज सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सार्वजनिक रस्त्याची जागा बळकावून अधिकारांचा गैरवापर आणि शासकीय परवाना नसताना बांधकाम केले, यामुळे नगर अभियंता सुभाष सावस्कर आणि संध्या सुभाष सावस्कर यांना महापालिकेने नोटीस दिली होती. त्यामुळे संध्या आणि सुभाष सावस्कर यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, त्याबाबत महापालिकेस पत्र मिळाले. यासंबंधी बुधवारी सुनावणी होणार आहे. पालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि नगर रचना अधिकारी झेड. ए. नाईकवाडी हजर राहणार आहेत.

नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने ती मनपाकडून देण्यात आली. दरम्यान, सावस्कर यांनी न्यायालयात धाव घेतली. मनपाकडून न्यायालयात अँड. किल्लेदार बाजू मांडणार आहेत. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी डॉ. जावळे, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, बांधकाम परवाना विभागाचे आर. डी. जाधव, नाईकवाडी यांनी कागदपत्रे संकलित केली.

वेळीच अहवाल का नाही?
नियोजित इमारतीचे नकाशा रेखाटन करणारा वास्तुविशारद व बांधकाम सुपरवायझर अभियंता यांनी नियमबाह्य बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास बांधकाम नियंत्रण कायद्यानुसार जागा मालकासह वास्तुविशारद व अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येते. मनपाने यासंदर्भात अजूनही संबंधितांना नोटीस दिलेल्या नाहीत. शहराच्या व्हीआयपी रोडवर अलीकडच्या काळात ही इमारत बांधली आहे. तेव्हा बांधकाम विभागातील निरीक्षकांनी पाहणी करून यासंदर्भातील मनपा बांधकाम विभागास वेळीच अहवाल का दिलेला नाही.